आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुरुष प्रधान संस्कृतीला फाटा देत चार बहिणींनी अंत्यसंस्कारा पूर्वीच्या निघालेल्या अंत्ययात्रेसमयी आपल्या लाडक्या पित्याला साश्रू नयनांनी खांदा दिला. बुलडाणा तालुक्यातील भादोला गावात या अंतिम निरोपाचा हा दुखवट्याचा प्रसंग गावकऱ्यांनी अनुभवला. तालुक्यातील ग्रामीण भागात शेतकरी सोसायटीचे सेक्रेटरी म्हणून काम करणारे पुंजाजी तुकाराम खडेकर यांचे रविवारी आकस्मिक निधन झाले. पुंजाजी तुकाराम खडेकर यांनी शेतकरी हित जोपासत ५८ वर्ष सेवा दिली. विशेषता भादोला, डोंगर शेवली, केळवद, सवणा येथे त्यांनी भरीव काम केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावल्याने ते अस्वस्थ होते. अखेर रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या चार मुलींनी त्यांना खांदा दिला. स्मशानभूमीत पार्थिवाला अग्नीही मुलींनीच दिला. यावेळी गावकऱ्यांचे डोळे पाणावले होते.
अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांच्या आशा जाधव, उषा चव्हाण, वर्षा भोंडे, मनीषा भोसले या चार मुलींनी पुढाकार घेतला. पित्याला खांदा देऊन सर्व अंत्यसंस्कारही पार पाडले. पुरुषप्रधान संस्कृतीला फाटा देत या चार लाडक्या मुलींनी आपल्या वडिलांना अखेरचा निरोप दिला. बुलडाणा जिल्हा हा सत्यशोधक चळवळीला मानणारा जिल्हा आहे. त्यातच भादोला या गावात शाहीर वामनदादा कर्डक हे येऊन गेलेले आहे. त्यामुळे हे गावही चळवळीत काम करणारे आहेत. त्याच गावात हा अंत्यसंस्काराचा कार्यक्रम बरेच काही सांगून गेला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.