आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुण्याहून अमरावतीकडे जाणारी एक कार क्रमांक एमएच २७ बीव्ही ९२४२ च्या चालकाला झोप लागल्याने महामार्गाच्या मधोमध उलटली. यामध्ये दोघे गंभीर जखमी, तर अन्य दोघांना किरकोळ दुखापत झाली. हा अपघातशुक्रवारी पहाटे समृद्धी महामार्गावर घडला. आज पहाटे चारच्या सुमारास अमरावती येथील रोहित महाले ( २९), तेजस बिलेवार (३ ०) व प्रसन्नजीत कांबळे ( २२) कारने पुण्याहून अमरावतीकडे जात होते. या दरम्यान समृद्धी महामार्गाच्या चॅनल क्रमांक ३१९.९ जवळ चालक सुयोग धामडे ( २८) याला झोप लागली. त्यामुळे कार अनियंत्रित होऊन महामार्गाच्या मधोमध उलटली. या अपघातात तेजस बिलेवार व प्रसन्नजीत कांबळे गंभीररीत्या जखमी झाले. चालक सुयोग धामडे आणि रोहित महाले हे दोघे किरकोळ जखमी झाले.
अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये कारचे पूर्णपणे नुकसान झाले. मात्र, एअर बॅग असल्यामुळे प्राणहानी टळली. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस दलाचे उपनिरीक्षक शैलेश पवार, नायक पोलिस काँस्टेबल विठ्ठल काळुसे, रोशन शेख, चंद्रशेखर उबाळे, रमेश काळे, क्यूआरव्ही वाहनाचे प्रदीप श्रीरामे, कैलास आघाव, अनुदीप पवार, उमेश चव्हाण घटनास्थळी दाखल झाले. जखमींना कारबाहेर काढून त्यांना उपचारासाठी तातडीने बिबी येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले.
चालक, प्रवाशांसाठी ''समृद्धी''वर सुरक्षिततेचे प्रबोधन महामार्ग पोलिस विभागाचे निरीक्षक गणेश गिरी आणि सहायक पोलिस निरीक्षक संदीप इंगळे यांच्या मार्गदर्शनात समृध्दी महामार्गावर दररोज सुरक्षिततेबाबत प्रबोधन केले जात आहे. पेट्रोल पंप, टोल नाक्यांवर थांबलेल्या चालक व प्रवाशांना यावेळी रस्ते अपघात टाळण्याचे व सुरक्षितता बाळगण्याचे आवाहन केले जात आहे. वाहनचालक व प्रवाशांनी कारमध्ये प्रवास करताना सीट बेल्टचा वापर करावा. वाहन शंभर ते दीडशे किलोमीटर चालवल्यावर किमान पाच मिनिटे विश्रांती घ्यावी, असे आवाहन अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून केले जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.