आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रज्ञावान विद्यार्थ्याचा शोध:आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्तीसाठी ‘प्रबोधन’च्या चार विद्यार्थिनी पात्र

बुलडाणा25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्तीसाठी प्रबोधन विद्यालयाच्या चार विद्यार्थीनी पात्र ठरल्या आहे. या सर्व विद्यार्थ्यांना इयत्ता बारावीपर्यंत शिष्यवृत्ती मिळणार आहे. मानव संसाधन मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने दरवर्षी इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यासाठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी शिष्यवृत्ती परिक्षा घेण्यात येते. आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्याचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना करण्यासाठी इयत्ता बारावीपर्यंतचे शिक्षण या शिष्यवृत्तीमधून करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे.

या परिक्षेत प्रबोधन विद्यालयाच्या धनश्री संजय चिंचोले हिने सर्वसाधारण गटात पंधरावा क्रमांक प्राप्त केला आहे. तर वेदिक कमालकर लोखंडे हिने इतर मागासवर्ग प्रवर्गात पंधरावा क्रमांक प्राप्त केला आहे. रितिका रवींद्र उबाळे हिने इतर मागासवर्गीय प्रवर्गात ५८ वा क्रमांक प्राप्त केला असून सायली राहुल जैन हिने सर्वसाधारण गटात ९३ वा क्रमांक प्राप्त केला आहे. या चारही विद्यार्थीनीना भारत सरकारच्या वतीने बारा हजार रूपये शिष्यवृत्ती मिळणार असून ती बारावीपर्यंत एकूण ४८ हजार रूपये मिळणार आहे. या चारही प्रज्ञावान व्यक्तीरिक्त पार्थ जाधव, अमृता चौधरी, अंकिता जाधव, सोहम साळवे, वेदांत जवंजाळ, पूनम बाजड इत्यादी विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.या सर्व विद्यार्थ्याना अरविंद कोलते यांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक ओमप्रकाश नव्हाल, उपमुख्याध्यापक अरविंद सैतवाल व पर्यवेक्षक चंद्रकांत जोशी यांनी कौतुक केले.

बातम्या आणखी आहेत...