आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साबण जप्त:टेंभुर्णा येथून चोरीचे चौदा लाख रुपयांचे साबण जप्त

खामगाव8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर येथील एका चोरीच्या प्रकरणातील आरोपीने दिलेल्या माहितीवरून नागपूर पोलिसांनी शुक्रवार, १८ नोव्हेंबर रोजीच्या रात्री तालुक्यातील टेंभुर्णा येथील एका गोडाऊनमधून तब्बल चौदा लाख रुपयांचे चोरीचे साबण जप्त केले. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, साबण चोरी प्रकरणी नागपुरातील कोंढाळी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीस अटक केली असता त्याने चोरीसंदर्भात महत्वपूर्ण माहिती दिली. सदर आरोपीला घेऊन नागपूर पोलिस शुक्रवार, १८ नोव्हेंबर रोजी रात्री खामगाव तालुक्यातील टेंभुर्णा येथे दाखल झाले होते. यावेळी पोलिसांनी तेथील एका गोडाऊनमधून तब्बल चौदा लाख रुपयांचे चोरीचे साबण जप्त केले. त्यानंतर जप्त केलेला माल व आरोपीला घेऊन पोलिस नागपूरकडे रवाना झाले. या प्रकरणाचे धागेदोरे खामगावशी निगडीत असल्याची चर्चा आहे. सदर प्रकरणातील आरोपी हा खामगाव येथील रहिवासी असल्याचे पोलिस सूत्रांकडून कळाले असून यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

बातम्या आणखी आहेत...