आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बुलडाणा:बनावट कागदपत्रे तयार करुन शासनाची फसवणुक, जिल्हा कौशल्य रोजगार अधिकारी चिमणकर विरोधात गुन्हा दाखल

बुलडाणा10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता कार्यालय बुलडाणा - Divya Marathi
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता कार्यालय बुलडाणा
  • 4 लाख 11 हजार रुपये हडपल्याचा आरोप, ग्रामीण विकास बहुद्देशीय संस्था अध्यक्षासह पदाधिकाऱ्याचाही समावेश

बनावट दस्तावेज तयार करुन शासनाची चार लाख 11 हजार 894 रुपयाचा अपहार केल्याप्रकरणी वाशिमच्या एलसीबी खात्याने बुलडाणा येथील चौघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मागदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्तांसह चौघांचा समावेश आहे. बुलडाणा शहर पोलीस स्टेशनला 12 जून रोजी हे प्रकरण वर्ग करण्यात आले आहे.

येथील जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त गणेश पांडुरंग चिमणकर, शिवाजीराजे भोसले ग्रामीण विकास व बहुउद्देशीय संस्था बुलडाणाचे अध्यक्ष किरण भगवान धंदर, सचिव शरद प्रकाश बावस्कर व ओम साई कार केअर गॅरेजसह जागेचे मालक नीलेश अरविंद शिंदे यांच्याविरूद्ध लाचलुचपत प्रतिबंधक खात्याची चौकशी 23 मार्च 2020 ते 12 जुन 2020 पर्यंत होती. त्यांनी चौकशी केल्यानंतर या चौघांविरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याजिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त गणेश पांडुरंग चिमणकर यांनी चिखली रोडवर ओम साई कार केअर गॅरेजच्या नावावर शासकीय अनुदानाची प्रक्रिया पूर्ण केली होती. स्वतःचा आर्थिक लाभ होण्यासाठी या चौघांनी बनावट दस्तावेज तयार केले. जिल्हा कौशल्य विकास रोजगार केंद्रला लागणार्या या सर्व बनावट कागदपत्रांची पुर्तताही केली. त्यासाठी इन्स्ट्युट चालक व इतर दोघांना हाती धरून शासकीय प्रक्रिया पूर्ण केली. हे सर्व करतांना गैर उद्देशाने गुन्हेगारी स्वरुपाचा कट रचुन अप्रामाणिकपणे शासनाची फसवणुक केली. यामध्ये 4 लाख 11 हजार रुपयांचे अनुदान जमा झाले. हे लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे मार्च महिन्यात प्राप्त तक्रारीचे अनुषंगाने तपासात निष्पन्न झाले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या चौकशी अंती इन्सिस्टयुट नसतानाही शासकीय अनुदानाचा अपहार केल्याचा प्रकार समोर आला. यापक्ररणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वाशिमचे पोलीस उपअधीक्षक शंकर व्ही. शेळके यांनी १२ जून रोजी बुलडाणा शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यावरुन चौघांविरोधात बुलडाणा शहर पोलिसांत लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...