आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अज्ञात व्यक्तीकडुन फसवणूक:मोताळा येथील स्टेट बँकेच्या खात्यातून पैसे विड्रॉल करून केली फसवणूक

मोताळा8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्टेट बँकेच्या बचत खात्यातून ९ हजार ८०० रुपये अज्ञात व्यक्तीने काढून घेत फसवणूक केल्याची घटना २३ जूनच्या दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात बोराखेडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.येथील प्रभाग क्र.३ मधील शे.आबीद शे.बुडन हे मागील चार वर्षांपासून बुलडाणा येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत आधार सेंटर चालवत आहेत. त्यांचे येथील स्टेट बँकेत बचत खाते आहे.

२३ जून रोजी नेहमीप्रमाणे शे.आबीद हे बुलडाणा येथे आधार सेंटरवर काम करताना दुपारी २ वाजेच्या सुमारास शे.आबीद यांच्या मोबाइलवर त्यांच्या स्टेट बँकेच्या बचत खात्यातून ९ हजार ८०० रुपये विड्रॉल झाल्याचा संदेश आला. त्यामुळे शे. आबीद यांनी मोताळा येथील स्टेट बँक गाठून खात्यातील विड्रॉल झालेल्या रकमेसंबंधी चौकशी केली असता पैसे आधार कार्डावरून काढले गेले असल्याचे सांगितले. परंतु ते कोठे व कुणी काढले यासंबंधी बँकेने कुठलीच माहिती दिली नाही. आधार कार्ड कुणालाही न देता पैसे कसे काढले गेले. यासंबंधी बँकेने कोणत्याही प्रकारचे समाधानकारक उत्तर दिले नाही.

त्यामुळे शे.आबीद यांनी २८ जून रोजी बुलडाणा येथील ग्राहक तक्रार मंच येथे ऑनलाइन तक्रार नोंद केली. तसेच सायबर क्राईमच्या पोर्टलवर सुद्धा शे.आबीद यांनी तक्रार नोंदवली आहे. तरीसुद्धा सेंट्रल बँक, बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, एचडीएफसी बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, आयसीआयसीआय बँक, आयडीएफसी बँक आणी अॅक्सिस बँक अशा बँकांतून आधार कार्ड द्वारे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांचे खाते चेक करून पैसे काढण्याचा प्रयत्न केल्याचे ईमेलद्वारे समजले आहे. अज्ञात व्यक्तीने २३ जून रोजी शे.आबीद यांच्या खात्यातून ९ हजार ८०० रुपये विड्रॉल करून त्यांची फसवणूक केल्याची तक्रार शे. आबीद यांनी १ ऑगस्ट रोजी बोराखेडी पोलिसांत दिल्यावरून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास बोराखेडी ठाणेदार हे करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...