आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:मलकापुरात उद्यापासून मोफत कर्करोग तपासणी शिबिर; लाभ घेण्याचे भाजपा जैन प्रकोष्ठचे आवाहन

मलकापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संपूर्ण जगासमोर कर्करोग या आजाराने ग्रासलेले असताना भविष्यात खूपच बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते या बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन भाजपा जैन प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश यांच्या पुढाकारातून संपूर्ण महाराष्ट्रात कॅन्सरमुक्त अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत मलकापूर तालुक्यासाठी ११ मे ते १७ मे पर्यंत मोफत कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. गरजूंनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन भाजप जैन प्रकोष्ठ प्रदेश सचिव डॉ. योगेश पटणी यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे.

कर्करोगामुळे लाखो लोकांना जीव गमवावा लागत आहे. सध्या परिस्थितीत बदलती जीवन शैली, भेसळ युक्त आहार, व्यसन या आदी कारणांमुळे कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. कर्करोगाचे निदान व कर्करोगास कारणीभूत जीवनशैली बद्दल जनजागृती व्हावी, या उद्देशाने भाजपा जैन प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने २६ जानेवारी ते १५ ऑगस्ट या दरम्यान कॅन्सर मुक्त महाराष्ट्र अभियान या विशेष उपक्रमास सुरुवात केली होती. यामध्ये महाराष्ट्रातील विविध ठिकाणी कॅन्सर निदान होण्यासाठी आवश्यक उपकरणांसह असलेल्या व्हॅन द्वारे मोफत स्वरूपात कॅन्सरचे निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या अभियानाचा मलकापूर परिसरातील जनतेला सुद्धा लाभ व्हावा, या उदात्त हेतूने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे ११ मे रोजी चांडक विद्यालय, १२ मे झंवर हॉस्पिटल, १३ मे भारत लॉन्स, १४ मे ग्रामपंचायत मंगल कार्यालय वडोदा, १६ मे ग्रामपंचायत कार्यालय विद्युत नगर व १७ मे रोजी लखानी जीन अशा विविध ठिकाणी या शिबिराचे मोफत स्वरूपात आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेमध्ये भाजपा तालुका अध्यक्ष संजय काजळे, शहराध्यक्ष मिलिंद डवले, प्रदेश सचिव योगेश पाटणी यांनी दिली. यावेळी वीरसिंह राजपूत, मनोज पाटील, अनिल गोठी, विजय वर्मा, समाधान सुरवाडे, धीरज वैष्णव, श्रीकृष्ण तायडे, दीपक ईटणारे, नागेश सुरंगे, यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...