आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा वयाची ७५ वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये मोफत प्रवास या योजनेचा खामगाव आगारातून सुटणाऱ्या बसमधून डिसेंबर २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या तीन महिन्याचा कालावधीत २ लाख ३ हजाराच्यावर प्रवाशांनी लाभ घेतला आहे. विशेष म्हणजे फेब्रुवारी महिन्यात सर्वात जास्त ७१ हजार ८८५ प्रवाशांनी या योजनेचा फायदा घेतल्याची माहिती आगार प्रमुख संदीप पवार यांनी दिली. राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधील प्रवास हा सुरक्षीत प्रवास मानला जातो.
त्यामुळे अनेक नागरिक खासगी, ट्रॅव्हल्स वाहनातून प्रवास करण्या ऐवजी बसच्या प्रवासाला प्राधान्य देतात. राज्य परिवहन महामंडळा तर्फे विद्यार्थी रुण, ज्येष्ठ नागरीक, पत्रकार, स्वातंत्र्य संग्राम सैनिक, आमदार, खासदार यांच्यासाठी प्रवास भाड्यात सवलत देण्यात येते. ६५ वर्ष पूर्ण केलेल्या वृद्धाला जर बस मधून प्रवास करायचा असेल तर बसच्या तिकिटांत ५० टक्के सवलती देण्यात आली आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वयाची ७५ वी पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकाला राज्य परिवहन महामंडळाच्या बस प्रवास मोफत करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. याची अंमलबजावणी घोषणे नंतर काही दिवसाने सुरु झाले. खामगाव आगारातील ४६ बस वेगवेगळ्या रस्त्यावरुन प्रवाशांना घेवून धावत आहे. या माध्यमातून आगाराला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. त्याच बरोबर ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक देखील प्रवास करत आहे, अशा नागरिकांची संख्या महिनो गणती वाढत असल्याचे दिसून येत आहे.
प्रवाशांनी लाभ घ्यावा
राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवाश्यांसाठी विविध योजना आहे. त्या योजनांचा प्रवाशांनी लाभ घ्यावा. एसटीचा प्रवास हा सुरक्षीत प्रवास असल्याने प्रवाश्यांनी बसमधून प्रवास करावा. - संदीप पवार, आगार व्यवस्थापक खामगाव.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.