आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावाशीम जिल्हात मंगरुळपीरमधील पाच मित्रांनी पुढाकार घेत चक्क स्मशानभुमीचे पुनरुज्जीवन करत मित्र प्रवीण देशमुख याचा वाढदिवस साजरा केला. या सर्व मित्रांना नगरसेवक अनिल गावंडे यांनी एकत्रीत आणत या उपक्रमाची जबाबदारी सोपवली होती. सर्वांनी ही जबाबदारी चोख पार पाडून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.
गणेश राठी यांनी स्मशान भूमीच्या शेडची, तर पुरुषोत्तम चितलांगे यांनी पाण्याची टाकी ली. तसेच तिसरे मित्र बसवली. संजय मिसाळन यांनी विजेचे नऊ खांब उभारुन विजेची व्यवस्था केली. प्रवीण देशमुख यांनी इंधन विहिरीवरील विद्युत मोटर पंप उपल्ब्ध करुन दिले. तर ऊमेश भोजने यांनी स्मशानातील ओटे उभारण्याची जबाबदारी स्वीकारली. शासनाच्या निधीची वाट न पाहता पाच ही मित्रांनी स्मशानभुमीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी पुढाकार घेतला. या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतूक होत आहे. दरम्यान, प्रभाग क्रमांक एकमधील हिंदु स्मशानभूमीचे ऊदातीकरण करण्यासाठी शहरातील सुज्ञ व्यक्तींनी समोर येऊन मदत करावी, अशी विनंती नगरसेवक अनिल गावंडे यांनी केली. या कार्यक्रमात अंतर्राष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोगचे विदर्भ अध्यक्ष आश्विन विटकरे,अकोला यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.