आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिंदे गटात गेलेले खा. प्रतापराव जाधव यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याच्या ठपका ठेवत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून बुलडाणा जिल्हा संपर्कप्रमुख पदावरून प्रतापराव जाधव यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे पत्रक शिवसेना मध्यवर्ती कार्यालय मुंबई येथून प्रसिध्दीस देण्यात आले आहे.
खा. प्रतापराव जाधव हे शिंदे गटात सामील झाल्यानंतर २२ जुलै रोजी जिल्ह्यात परतले होते. त्यानंतर त्यांनी उध्दव ठाकरे यांना सोडल्याबद्दल आपल्या भाषणातून मेहकर, चिखली व सिंदखेड राजा येथे मार्गदर्शन केले होते. दरम्यान, त्यांना पाठिंबा देत घाटाखालील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शांताराम दाणे यांनीही उध्दव ठाकरे यांना सोडचिठ्ठी दिली होती. शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी जिल्हा संपर्क प्रमुख पदावरुन खा. जाधव यांची तर मलकापूर व जळगाव जामोदसाठी नेमलेले जिल्हा प्रमुख शांताराम दाणे पाटील यांनाही जिल्हाप्रमुख पदावरून हटवले. त्यांच्या जागी वसंतराव भोजने यांची नव्याने जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. राजू मिरगे व संजय अवताडे यांनाही उपजिल्हाप्रमुख पदावरून काढून टाकले आहे, तर नांदुऱ्याचे तालुकाप्रमुख संतोष डिवरे, मलकापूरचे तालुकाप्रमुख विजय साठे, व शेगावचे तालुका प्रमुख रामा थारकर यांनाही तालुकाप्रमुख पदावरून हटवण्यात आल्याचे शिवसेना कार्यालयाकडून कळवले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.