आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्णय:मागण्यांसाठी जैन समाजाचा मूकमोर्चा

मोताळाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जैन धार्मियांचे आस्थास्थान असलेल्या सम्मेद शिखरजी तीर्थ स्थळाला केंद्र आणि झारखंड सरकारने पर्यटनस्थळ घोषित केल्याचा निर्णय मागे घेवून तीर्थस्थळ घोषीत करण्यात यावे, या मागणीसाठी सकल जैन समाजाच्या वतीने बुधवारी मूकमोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.जैन मंदिरापासून मोर्चा निघून स्टेट बँक चौक, बसस्थानक चौकातून मार्गक्रमण करत तहसील कार्यालयावर पोहोचला. निवेदनात म्हटले आहे की, जैन धार्मियांचे सम्मेद शिखरजी तीर्थस्थळाला केंद्र सरकार, झारखंड सरकारने पर्यटनस्थळ घोषीत करण्याचा निर्णय घेतला आहे.

तीर्थस्थळाची पवित्रता अबाधित ठेवण्यासाठी सरकारने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. मोर्चात सुरेश जैन, नितीन जैन, भूषण जैन, प्रवीण जैन, सुशील जैन, हर्षल जैन, बाबूलाल जैन, प्रदीप जैन, बन्सीलाल जैन, गणेश जैन, कल्पना संचेती, पुष्पा धोका, रक्षा जैन, नीतल जैन, भारती जैन, पूजा जैन, ममता जैन, मयुरी जैन, कांचन जैन आदी सहभागी झाले.

बातम्या आणखी आहेत...