आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव वन विभागाची कारवाई:राखीव वनपरिक्षेत्रात गौण खनिजांचे उत्खनन करणाऱ्या फरार आरोपीस अटक; आरोपीस दोन दिवसांची वन कोठडी

जळगाव जामोद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भेंडवळ बीट मधील कवठळ येथील राखीव वन क्षेत्रात अवैधरीत्या प्रवेश करून पोकलेनच्या साह्याने गौण खनिजांचे उत्खनन करताना वन विभागाच्या पथकाने पोकलेन मशीनसह साहित्य जप्त केले होते. ही कारवाई मागील २२ एप्रिल रोजी करण्यात आली होती. परंतु मुख्य आरोपी फरार झाला होता. वन कर्मचाऱ्यांनी त्याचा शोध घेवून त्याला १० मे रोजी अटक केली आहे. त्याला संग्रामपूर येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास दोन दिवसाची वन कोठडी सुनावली आहे. राखीव वन क्षेत्रात अवैधरीत्या प्रवेश करून पोकलेनच्या साहयाने गौण खनिजांचे उत्खनन होत असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी बी.डी. कटारिया यांना २२ एप्रिल रोजी मिळाली.

यावेळी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून गौण खनिजांचे उत्खनन करणाऱ्या पोकलेनसह, साहित्य जप्त केले. परंतु आरोपी हा घटनास्थळावरून पसार झाला होता. वन कर्मचाऱ्यांनी त्याचा शोध घेवुन त्याला १० मे रोजी अटक केली. पुढील तपास उपवन संरक्षक अक्षय गजभिये, सहायक वनसंरक्षक आर. आर. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. ही कारवाई वनपाल पी.जी. सानप, वनपाल जी. जी. दंडे, वनरक्षक एस. पी. देवकर, बी. एम. खेडकर, ए. आर. खेडकर एस. एस. बुधवत, ए. जी. घुईकर, ए. बी. पर्वते, नीता फलके, प्रकाश चितोडे, गणेश तराडे यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...