आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इमारतीसाठी निधी:मलकापूर येथील नगर पंचायतीच्या नवीन इमारतीसाठी निधी देणार; आ. राजेश एकडे यांनी आमसभेत बोलतांना दिले आश्वासन

मलकापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मतदारसंघात शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी मतदार संघामध्ये विविध योजनेच्या माध्यमातून भरीव निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण महाविकास आघाडी शासनाकडे पाठपुरावा करू. तसेच पंचायत समितीच्या नवीन इमारतीसाठी चार कोटी रुपयांचा निधी लवकरच उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आमदार राजेश एकडे यांनी दिले.

मलकापूर पंचायत समितीची आमसभा व सरपंच मेळावा ३१ मार्च रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.राजेश एकडे हे होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून बाजार समितीचे उपमुख्य प्रशासक संतोष रायपुरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बंडू चौधरी, शहराध्यक्ष राजू पाटील, सरपंच संघटनेचे ज्ञानदेव ढगे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळू भाऊ पाटील, शहराध्यक्ष अरुण अग्रवाल, गटविकास अधिकारी तथा प्रशासक डॉ.एस.टी.चव्हाण यांच्यासह आदींची उपस्थिती होती. या सभेत विभागनिहाय टिपणी वाचन करण्यात आले.

त्यानंतर विभाग निहाय आढावा घेऊन त्यावर उपस्थित सरपंचाकडून काही तक्रारी, प्रश्न व सूचना मांडण्याबाबत आमदार यांनी सूचना केली. यामध्ये उपस्थित सरपंच व ग्रामस्थांनी तक्रारी व सूचना मांडल्या. वाकोडी ग्रामपंचायतीचे सरपंच पती सिद्धार्थ हेलोडे यांनी प्रधान मंत्री घरकुल योजनेच्या पपत्र ड मध्ये एस.सी आणी एसटीच्या यादीत इतर लोकांची नावे समाविष्ट असल्याने एस सी आणि एसटीवर अन्याय होत असल्याचे सांगीतले. आमसभेत उपस्थित करण्यात आलेल्या अपेक्षा, सूचना, तक्रारीवर आमदार एकडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देत त्या तक्रारींचे निराकरण करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी आ.एकडे यांनी मतदार संघामध्ये घरकुलांचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, रस्त्यांचा प्रश्न, ग्राम पंचायत इमारती दुरूस्तीचा प्रश्न यासह आदी समस्या ज्या आहेत त्या तातडीने निकाली काढण्यासाठी आपण महाविकास आघाडी शासनाकडे पाठपुरावा करून मतदार संघाला अतिरिक्त निधी उपलब्ध व्हावा व ज्या समस्या प्रलंबित आहेत त्या निकाली निघाव्यात, यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

यावेळी वाकोडी ग्रामपंचायतीचे सदस्य तथा मनसेचे परिवहन जिल्हाध्यक्ष गजानन ठोसर यांनी वाकोडी ग्राम पंचायतची जुनी इमारत शिकस्त झाल्याने व विद्युत पुरवठा तसेच इंटरनेट ही वेळोवेळी खंडित होत असल्याने शहरालगतच्या सर्व ग्रामस्थांना लागणाऱ्या शासकीय कागदपत्रांसाठी दररोज ये जा करावी लागते. शेवटी कागदपत्रे मिळाल्यावर शहरात तहसील, उपविभागीय अधिकारी, पोलिस स्टेशन, उपविभागीय पोलिस अधिकारी, पंचायत समिती, बॅका, शाळा सह इतर कार्यालये असल्याने ते दाखले शहरातच आणावे लागत असल्याने ग्रामपंचायतीची इमारत वाकोडी मध्यभागी स्थापन करून मलकापूर ग्रामीण व वाकोडी ग्रामपंचायत अंतर्गत शहरातच दोन्ही ग्रामपंचायतच्या प्रशासकीय इमारतीकरीता जागा उपलब्ध करून निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी रेटून धरली.

यावेळी मलकापूर तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्यांसह पंचायत समितीचे विविध विभागाचे प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...