आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील काही गावांमधून ग्रामपंचायत भवनाच्या स्वतंत्र इमारतीसाठी निधी मंजूर करून देण्यात यावा अशी मागणी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्याकडे राजकीय नेते करत होते. दरम्यान, या मागणीची दखल घेत पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी १४ ग्रामपंचायत भवनासाठी २ कोटी ५२ लाखांचा निधी मंजूर करून घेण्यात त्यांच्या प्रयत्नाना यश आले आहे.
गावाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असलेले कार्यालय म्हणजे ग्रामपंचायत भवन. परंतु अनेक गावांमध्ये आजही ग्रामपंचायत कार्यालयाकडे स्वतःची इमारत नाही. हीच बाब हेरून जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघातील बारा ग्रामपंचायतीकरिता जनसुविधेअंतर्गत ग्राम पंचायत भवनासाठी प्रत्येकी १८ लाख असा एकूण २ कोटी २८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये लोणार तालुक्यातील खळेगाव, कारेगाव तर देऊळगाव राजा तालुक्यातील नागणगाव, उंबरखेड, तुळजापूर येथील ग्रामपंचायत कार्यालयाचा समावेश आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.