आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा:रोहींचा बंदोबस्त करण्यासाठी वन जमिनीला लागून खोदणार चरी

सिंदखेडराजा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्या ठिकाणी वन विभागाच्या जमिनी शेतकऱ्यांच्या जमिनींना लागून आहे, त्या ठिकाणी मोठमोठे चरी खोदण्यात यावी. जेणेकरून या चऱ्यांमध्ये पाऊस पडल्यानंतर पाणी साचल्या जाईल आणि त्या साचलेल्या पाण्यामधून वन्यप्राणी शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान करण्यासाठी जाणार नाही, असा प्रस्ताव माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी जिल्हाधिकारी व वन विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर मांडला. दरम्यान उपरोक्त अधिकाऱ्यांनी त्याला मान्यता दिली असल्याची माहिती डॉ. खेडेकर यांनी दिली आहे.

शेतकरी संघर्ष कृती समितीच्या आंदोलनाची दखल घेत, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी शेतकऱ्यांना होणाऱ्या वन्य प्राण्यांच्या त्रासा बद्दल, पिकांच्या नुकसानी बाबत जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री यांच्याकडे शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. तसेच वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. दरम्यान ५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे बैठक लावली. दरम्यान बैठकीत डॉ. खेडेकर यांनी सांगितले की, ज्या ठिकाणी चर खोदणे शक्य होणार नाही त्या ठिकाणी दर्जेदार तार कंपाउंड करावे. तसेच तार कुंपणासाठी शासनाकडून वन्यप्राणीग्रस्त शेतकऱ्यांना विशेष अनुदान देण्यासाठी शासनाकडे शिफारस करावी. याचबरोबर तत्कालीन सरकारमध्ये डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या कार्यकाळात वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या पीक नुकसानीबाबत शासनाने २२ जुलै २०१५ रोजी शासन परिपत्रक काढले होते, ते परिपत्रक लागू करावे.

वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांच्या शेडनेटचे व त्यातील पिकाचे नुकसान झाले, तर अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विशेष मोबदला वन विभागाच्या वतीने तात्काळ देण्यात यावा, अशी मागणी माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी केली. या वेळी शेतकरी संघर्ष कृती समितीचे विजय घोंगे, संदीप पवार, गोळेगावचे सरपंच रामेश्वर कोल्हे, सुनील खरात, अनिल चित्ते, रामदास कोल्हे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...