आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मजुरांची थट्टा:रोजगार हमी योजनेचा फज्जा; योजनेकडे मजुरांनी फिरवली पाठ, मानधनात फक्त आठ रुपयांची वाढ; आता मिळणार 256 रुपये

संग्रामपूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण हमी योजनेच्या इतिहासातील सर्वात निचांकी मजुरी दरवाढ देशभर लागू झाली आहे. मजुरांच्या हाताला काम मिळावे व त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण व्हाव्यात, यासाठी शासनाने रोजगार हमी योजना सुरू केली. मजुरांना होणारे फायदे लक्षात घेता, ही योजना संपूर्ण देशात लागू करण्यात आली आहे. परंतु रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांच्या मानधनात नाममात्र आठ रुपयांनी वाढ करुन एक प्रकारे शासनाने थट्टा केल्याची भावना मजुरांमध्ये निर्माण झाली आहे. १ एप्रिलपासून २५६ रूपये मिळणार आहेत. त्यामुळे अनेक मजुरांनी या योजनेकडे पाठ फिरवली आहे.

राज्यातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी अनेक योजना राबवण्यात येत आहेत. त्यात सर्वात महत्वाची व ज्या योजनेचा प्रत्येक गावातील शेतकरी लाभ घेऊ शकतो, अशी योजना म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना होय. या योजनेत अनेक प्रकारचे लाभ शेतकरी घेऊ शकतात. या योजनेत भाग घेण्यासाठी लाभार्थ्यास सर्वप्रथम ग्रामपंचायत कार्यालयामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत मजूर म्हणून नोंदणीसाठी अर्ज करून जॉब कार्ड प्राप्त करून घ्यावे लागते.

त्यानंतर ग्रामपंचायतीकडे अर्ज करून कामाची मागणी करावी लागते. यानंतर ग्रामपंचायत ग्रामसभेत त्या लाभार्थीस काम मंजूर करण्यात येते. कामाची तांत्रिक व प्रशासकीय मान्यता झाल्यानंतर लाभार्थी स्वता व गावातील इतर मजूर काम करून कामे पूर्ण करतात. या योजनेतील मजुरीची रक्कम लाभार्थी व काम करणारे इतर मजुरांच्या बँक खात्यात जमा होते.

या योजनेत उपरोक्त अनेक बाबी मंजूर आहेत. शेततळे व फळबाग लागवड हे घटक शेतीतून स्थिर उत्पन्न मिळवून देण्यासाठी ही योजना खूप महत्वाची ठरत आहे. मागील काही वर्षात जिल्ह्यात समाधानकारक पाऊस होत नसल्यामुळे, शेतीचे उत्पन्न देखील कमी झाले आहे.

त्यामुळे शेतात राबणाऱ्या मजुरांची संख्या कमी होऊ लागली. अशा परिस्थितीत रोजगार हमी योजना ही मजुरांसाठी जीवनदायिनी ठरली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात मजुरांच्या हाताला कामे मिळावी व जिल्ह्यातील जलसंधारण देखील वाढावे, यासाठी रोहयो अंतर्गत विविध योजना गाव पातळीवर राबवल्या जातात. माती नाला, बांधबांधबंदिस्ती यासारखी कष्टाची कामे मजुराला करावी लागतात. तरी देखील शासनाकडून त्यांना दिला जाणारा मोबदला अत्यल्प आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यात राबवण्यात येत असलेल्या रोजगार हमी योजनेच्या मजुरीत गेल्या वर्षी अत्यल्प वाढ करण्यात आली होती. राज्यात कमी अधिक पावसामुळे दुष्काळी स्थिती दरवर्षी निर्माण होत आहे. या दुष्काळाचा ग्रामीण भागास सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी रोजगार हमी योजनेवर भर देण्यात आला आहे.

राज्यातील दुष्काळी स्थितीचा विचार होऊन मजुरीत वाढ होईल, असे अपेक्षित होते. परंतु, सरकारने मात्र वाढती महागाई, दुष्काळ याचा विचार केला नाही. या योजनेत २०२१ - २२ या वर्षात २४८ रुपये मजुरी मिळत होती. या वर्षात आता २५६ रुपये मजुरी मिळत आहे. म्हणजेच मजुरीत ८ रुपये वाढ करण्यात आल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

बातम्या आणखी आहेत...