आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिन जाधव यांचे मत:‘जी पॅट’ फार्मसीसाठी अत्यंत महत्त्वाची ; ‘समर्थ फार्मसी’त कार्यशाळा

देऊळगाव राजाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जी पॅट परीक्षा राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येत असून, ही परीक्षा फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या परीक्षेत यश संपादन केल्यानंतर एम फार्मसाठी प्रवेश मिळतो. तसेच मल्टिनॅशनल कंपनीत नोकरीची संधी उपलब्ध होते. यासह संशोधन करण्याची संधी मिळते. उच्च शिक्षणासाठी दरमहा १२ हजार ५०० शिष्यवृत्ती मिळते व पीएचडी करण्यासाठी संधी मिळते, असे प्रतिपादन फंडामेंटल फार्मसी बिझनेस औरंगाबादचे व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केले.

येथील समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात जी पॅट परीक्षे संदर्भात नुकतीच कार्यशाळा पार पडली. यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून फंडामेंटल फार्मसी बिझनेस औरंगाबादचे व्यवस्थापक सचिन जाधव उपस्थित होते. या वेळी प्राचार्य प्रा. प्रफुल्ल ताठे, विभाग प्रमुख प्रा. गोपालकृष्ण सीताफळे व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यशाळेचे प्रास्ताविक प्राचार्य प्रा. प्रफुल्ल ताठे यांनी केले. प्रमुख मार्गदर्शक सचिन जाधव यांचा परिचय करून देत जी पॅट परीक्षेचे महत्व व अशा कार्यशाळेचे मुलांच्या करिअरसाठी असलेले महत्त्व मुलांना पटवून दिले. तसेच संस्थेचे अध्यक्ष देवानंद कायंदे यांनी जीपॅट परीक्षेसाठी महाविद्यालयीन ग्रंथालयात संदर्भ ग्रंथ उपलब्ध करून देण्यात आले. त्याचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा व अशा कार्यशाळेचे मुलांच्या करिअरसाठी वारंवार आयोजन करण्याचे आवाहन केले.

सचिन जाधव यांनी पुढे आपल्या मार्गदर्शनात जी पॅट परीक्षा कशी उत्तीर्ण कराल व उत्तीर्ण होण्यासाठी संदर्भ ग्रंथांची माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांसोबत सामुदायिक चर्चा करून विद्यार्थ्यांचे परीक्षेविषयक प्रश्नांची समाधान केले. या कार्यशाळेचे आयोजन कॉलेजच्या करिअर गायडन्सचे विभाग प्रमुख प्रा. पवन नारखेडे, प्रा. अजय लहाने यांनी केले होते. आभार विभाग प्रमुख प्रा. गोपालकृष्ण सीताफळे यांनी मानले. तसेच करिअर जी पॅट संदर्भात अशा कार्यशाळा आयोजन करून मार्गदर्शन करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.

बातम्या आणखी आहेत...