आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआचार्य वेरुळकर गुरुजी यांच्या प्रेरणेने तालुक्यातील माटरगाव येथे कर्मयोगी वैराग्य मुर्ती संत गाडगेबाबा यांच्या ६६ व्या पुण्यतिथी निमित्त भव्य नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मानवतेचे पुजारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी वैराग्य मुर्ती गाडगे बाबांच्या शिकवणीनुसार सामाजिक धार्मिक शैक्षणिक व पर्यावरण विषयक कार्यात अग्रेसर असणाऱ्या श्री गुरुदेव सेवा मंडळ, श्री गुरुदेव नवदुर्गा उत्सव मंडळ, राष्ट्रधर्म युवा मंचाच्या वतीने व मोहनराव नारायणा नेत्रालय नांदुरा यांच्या सहकार्याने हे नेत्ररोग तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.
शिबिराचे उद्घाटन अनंतराव आळशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच श्रीकांत तायडे हे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून हभप ज्ञानदेव महाराज मिरगे, हभप भिकाजी महाराज मिरगे, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष मनिष देशमुख, नवदुर्गा उत्सव मंडळाचे संतोष डांगे, रामकृष्ण मार्के, ज्ञानदेव लोळ, नथ्थुजी बेलूरकर, मोहनराव नारायण नेत्रालयाचे सोनाग्रे दादा, मारोती देशमाने व इतर मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी मनिष देशमुख यांनी कर्मयोगी गाडगेबाबा यांचे विचारांची समाजाला असलेली आवश्यकतेबद्दल सांगून श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या विविध उपक्रमाबद्दल मार्गदर्शन केले. या शिबिराचा एकूण १५० रुग्णांनी लाभ घेतला. त्यापैकी गरजू रुग्णांना अल्पदरात शस्त्रक्रिया मोहनराव नारायणा नेत्रालय तर्फे करण्यात येणार आहे. तसेच शिबीर ठिकाणी सवलतीच्या दरात रुग्णांना चष्म्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे उपाध्यक्ष संजय मुरे यांनी तर आभार प्रदर्शन सचिव राम देशमुख यांनी केले. शिबिराच्या यशस्वितेसाठी दिलीप जाधव, मनोहर सारोळकर, मंगेश देशमुख, सुधीर धनोकार, प्रदीप देशमुख, गजानन बेलूरकर, अनिल भागवत, प्रशांत देशमुख, अक्षय चव्हाण, शुभम मिरगे, भुषण ठाकरे ऋषिकेश देशमुख, गोविंद देशमुख व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.