आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:ध्यानधारणेने मिळवा सुख- शांती, आनंद, ऊर्जा

खामगाव5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विचारांची शक्ती खूप मोठी आहे, परमात्म्याच्या आठवणीत मेडिटेशन (ध्यानसाधना) आणि योगाभ्यासाद्वारे परमात्म्याच्या संपर्कात राहून विचारांची सकारात्मक शक्ती वाढला. यातून खऱ्या अर्थाने सुख, शांती, आनंद, उत्सव आणि ऊर्जा मिळवता येईल, असे प्रतिपादन बी. के. पूनम दीदी इंदूर यांनी येथे केले.

ब्रह्माकुमारीच्या वतीने आयोजित ‘अलविदा तणाव’ या नऊ दिवसीय शिबिराच्या समारोप दिनी मार्गदर्शन करताना बी. के. पूनम दीदी बोलत होत्या. मी एक आत्मा आहे, अजर अमर अविनाशी आहे, परमात्म्याची संतान आहे, तर आत्म्याचे ७ गुण सुख, शांती, आनंद, प्रेम, पवित्रता व ज्ञान यावर माझा अधिकार आहे. ते परमात्म्याशी मेडिटेशनने मिळते. त्यासाठी सतत सकारात्मक विचार करण्याची गरज असल्याची माहिती गेल्या नऊ दिवसाच्या शिबिरात आपण सर्वांनी समजून घेतल्याचे पूनम दीदी म्हणाल्या.

मनुष्याच्या मनातील अंधार दूर व्हावा, तो आध्यात्मिकतेशी जुळावा, सत्त्वगुण आचार विचारात येऊन तणावमुक्त जीवन जगावे, यासाठीच ‘अलविदा तणाव’ शिबिर आयोजित करण्यात आले होते, असे प्रतिपादन समारोप वेळी केंद्र संचालिका तथा शिबिराच्या मुख्य आयोजक शकुंतला दीदी यांनी केले. तसेच आयोजनात सहकार्य देणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त केले.

या वेळी शिबिराला सहकार्य करणाऱ्या अनेकांचा यथोचित सत्कार करून स्मृतिचिन्ह देण्यात आले. कार्यक्रमात शेवटी अलविदा तणाव म्हणून तणावरूपी वेशभूषा धारक व्यक्तीला खामगावातून निरोप देण्यात आला तर तणावमुक्त झाल्याने हसणाऱ्या व्यक्तीचे स्वागत करण्यात आले. अलविदा तणावाचे स्टिकर गॅसच्या फुग्यांद्वारे आकाशात सोडण्यात आले, विविध गाण्यांवर नृत्य करून तणाव निघून गेल्याचा उत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी हजारो उपस्थितांनी सक्रिय सहभाग घेत, ताण-तणाव मुक्त राहण्याचा संकल्प घेतला. यावेळी पतंजली योगा ग्रुपच्या सदस्यांनी शंखनाद केला. तसेच भक्ती गीतावर सुंदर नृत्य सादर केले. एकूणच तणाव मुक्तीच्या माहोल मध्ये अलविदा तणावाचा कार्यक्रम उत्साहाने झाला. कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...