आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:शेगावात जुगारावर छापा, गुन्हे शोध पथकाची चौघांवर कारवाई

शेगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेगाव पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने ३ डिसेंबर रोजी स्थानिक बाळापूर रोडवरील हॉटेल अंबरच्या मागे असलेल्या घरात छापा मारून चार जुगारीसह ४३ हजार ५००रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. पथकास मिळालेल्या माहिती नुसार, हॉटेल अंबरच्या मागे असलेल्या मेहेंगे यांचे घरी छापा मारला असता एक्का बादशहा नावाचा जुगार खेळताना पंजाबराव मेहेंगे वय ५५ रा. शेगाव, परवेज युसुफ देशमुख रा. जळगाव, जुगलकिशोर राठी रा. वरवट बकाल, पुष्पाकर शेगोकार रा. शेगाव हे चौघे जण आढळले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे जवळून रोख ६१५० व मोबाइल असा ३७ हजार ३५० चा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी शेगाव पोलिसांनी महाराष्ट्र जुगार कायद्याअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास निरीक्षक नितीन इंगोले, गणेश वाकेकर, राहुल पांडे, विजय साळवे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...