आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सव:साखरखेर्डा येथे गणरायाची विसर्जन मिरवणूक शांततेत

साखरखेर्डाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

संवेदनशील गाव असा ठपका असलेल्या साखरखेर्डा येथील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुक शांततेत पार पडली. यावेळी हिंदू-मुस्लीम एकतेचे दर्शन घडले. अगदी वेळेवर गणेश विसर्जन करण्यासाठी मंडळांचे अध्यक्ष, सदस्य, शांतता समितीचे सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील, महसूल कर्मचारी, यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.

मिरवणूक दगडी मस्जिद समोर येताच उपविभागीय अधिकारी अहिरे, तहसीलदार सावंत, उपविभागीय पोलिस अधिकारी यामावार, ठाणेदार जितेंद्र आडोळे, दुय्यम ठाणेदार सचिन कानडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला. दरम्यान, मशिदीवर गुलाल उडू नये म्हणून मशिदीच्या समोर आच्छादन टाकून दोन टॉवर उभारण्यात आले होते तेथे व्हिडिओ चित्रीकरण करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. अहिल्याबाई होळकर गणेश मंडळ, परदेशी गणेश मंडळ , प्रल्हाद महाराज मंदिर गणेश मंडळ, श्री शिवाजी गणेश मंडळ, हिंदु सूर्य महाराणा प्रताप गणेश मंडळ, महात्मा फुले गणेश मंडळ ह्या मिरवणुकीत सहभागी झाले होते. दरम्यान, ठिकठिकाणी गणेशावर पुष्पवृष्टी करण्यात आली. महात्मा फुले गणेश मंडळाने आगळा वेगळा देखावा सादर करुन सर्वांचे लक्ष वेधले. यावेळी ठाणेदारासह पोलिसही विसर्जनादरम्यान ढोलताशांच्या गजरात थिरकले.

बातम्या आणखी आहेत...