आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

बुलडाणा:गांधी, नेहरू व आंबेडकर यांना एकत्रित मांडले गेले पाहिजे, काँग्रेसच्या नवचेतना @ 150 वेबिनारमध्ये ‘दिव्य मराठी’चे राज्य संपादक संजय आवटे यांचे प्रतिपादन

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गांधी, नेहरू व आंबेडकर यांना एकत्रित मांडले गेले पाहिजे

महात्मा गांधी, पंडित नेहरू व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे खरेतर भारत घडला. मात्र, या तिघांच्या विचार प्रवाहालाच वेगवेगळे सांगण्यात आले. गांधींचा राष्ट्रवाद, नेहरूंची स्वातंत्र्यता व बाबासाहेबांनी संविधान दिले. मात्र, या तिघांच्या मत प्रवाहाला वेगवेगळ्या पद्धतीने मांडल्या गेल्यामुळे संभ्रम निर्माण करण्यात आला आहे. हा संभ्रम त्यांना एकत्रित मांडले तर दूर होईल, असे विचार दिव्य मराठीचे राज्य संपादक संजय आवटे यांनी रविवारी मांडले.

महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्ताने जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने नवचेतना @ १५० या वेबिनार व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या मालिकेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, चंद्रकांत वानखेडे, कुमार केतकर यांचे विविध विषयावर व्याख्यान झाले होते. रविवारी ‘गांधी+नेहरू+आंबेडकर=भारत’ विषयावर दिव्य मराठीचे राज्य संपादक संजय आवटे यांनी शेवटचे पुष्प गुंफले. या वेबिनारचे अध्यक्षस्थानी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले हे होते. वेबिनारचे आयोजन स्व. मरकुजी बुरुंगले विद्यालय शेगावच्या वतीने करण्यात आले होते. वेबिनारला उपस्थित मान्यवरांचा परिचय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. राहुल बोंद्रे यांनी करून दिला. या वेबिनारला अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष विजय अंभोरे, लक्ष्मणराव घुमरे, हर्षवर्धन सपकाळ, ज्योती ढोमणे, जयश्रीताई शेळके, संजय राठोड, माजी आ. बाबूराव पाटील, श्याम उमाळकर, जिल्ह्याच्या संपर्कमंत्री यशोमती ठाकूर आदींची उपस्थिती होती. आभार प्रदर्शन डॉ. इसरार यांनी केले.

काही न करणारे राष्ट्रभक्तीचे प्रमाणपत्र दाखवतात : पटोले
विचारांना एकत्रित आणून विचार प्रवाह नवीन पिढीपर्यंत पोहाेचवणे आवश्यक आहे. ठामपणे विचार मांडा नाहीतर जे बीज अलीकडे पेरल्या जात आहे त्याचा परिणाम आपण भोगतो आहे. अनेकांनी भारताच्या स्वातंत्र्य लढयात काहीच केले नाही. पण ते आज राष्ट्रभक्तीचे प्रमाणपत्र घेऊन फिरत आहेत, असा आरोप विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

मूल्यांबाबत तिघांना एकत्रित आणा
गांधी, नेहरू व आंबेडकर एकत्रित केले तर अपहरण होणार नाही. याबाबत राजकीय भूमिका घेणे आवश्यक आहे. राजकीय प्रक्रियेत बदल केला पाहिजे. काँग्रेसमध्ये खुर्चीच्या मागे न पळता विचारांच्या मागे पळाले पाहिजे. हा विचार लोकांपर्यंत पोहाेचवा. मूल्यांबाबत तिघांना एकत्रित आणणे आवश्यक आहे, असेही विचार संजय आवटे यांनी मांडले.

महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्ताने जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने नवचेतना @ १५० या वेबिनार व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या मालिकेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, चंद्रकांत वानखेडे, कुमार केतकर यांचे विविध विषयावर व्याख्यान झाले होते. रविवारी ‘गांधी+नेहरू+आंबेडकर=भारत’ विषयावर दिव्य मराठीचे राज्य संपादक संजय आवटे यांनी शेवटचे पुष्प गुंफले. या वेबिनारचे अध्यक्षस्थानी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले हे होते. वेबिनारचे आयोजन स्व. मरकुजी बुरुंगले विद्यालय शेगावच्या वतीने करण्यात आले होते. वेबिनारला उपस्थित मान्यवरांचा परिचय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. राहुल बोंद्रे यांनी करून दिला. या वेबिनारला अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष विजय अंभोरे, लक्ष्मणराव घुमरे, हर्षवर्धन सपकाळ, ज्योती ढोमणे, जयश्रीताई शेळके, संजय राठोड, माजी आ. बाबूराव पाटील, श्याम उमाळकर, जिल्ह्याच्या संपर्कमंत्री यशोमती ठाकूर आदींची उपस्थिती होती. आभार प्रदर्शन डॉ. इसरार यांनी केले.

आवटे म्हणाले की, कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये विचारांचे आदान- प्रदान करण्याचे काम जिल्हा काँग्रेस कमिटीने केले आहे. आता मन की बात नाही तर जन की बात व्हायला पाहिजे. भारताचा राष्ट्रवाद काय आहे हे समजून घ्यायला पाहिजे. भारताचा प्रवास कसा झाला, भारत समजून घ्यायला पाहिजे. त्याला मन की बात लागत नाही. महात्मा गांधी यांनी हाच राष्ट्रवाद समजला होता अन‌् त्यांनी तो मांडण्याचा प्रयत्न केला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांकडून हा राष्ट्रवाद प्रगल्भ झाला. बाबासाहेबांनी राष्ट्रवाद हा धर्माच्या पायावर उभा राहणार नाही, याची काळजी घेतली. लोकशाहीच्या अनुषंगाने नेहरूंनी नियतीशी करार केला. गांधी, नेहरू व आंबेडकर यांचे मतभेद होते. पण ते वैचारिक पातळीवर एकच होते. जसे गांधींचा स्वतंत्र मतदारसंघाला विरोध होता. तसा बाबासाहेबांचाही होता म्हणून बाबासाहेबांनी राखीव मतदार संघाची स्थापना केली. या तीनही नेत्यांना वेगवेगळे करून काँग्रेसला संभ्रमात टाकल्या गेले. वास्तविक नेहरू, गांधी व आंबेडकर हे एकमेकाला परस्परपूरक असे होते.

0