आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक दिन:गणेशोत्सव मंडळातर्फे वाडी येथील शिक्षकांचा सत्कार ; समाज निर्माण करण्याच्या कार्याचा गौरव

खामगाव24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षक दिनाचे औचित्य साधून माँ जिजाऊ सांस्कृतिक बहुउद्देशीय क्रीडा मंडळाच्या वतीने वाडी येथील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. देशाची भावी पिढी तयार करण्याचे तसेच एक आदर्श समाज निर्माण करण्याचे कार्य शिक्षक करत असतात म्हणून त्यांचा व त्यांच्या कार्याचा गौरव झाला पाहिजे या हेतूने दिलीप सानंदा यांच्या मार्गदर्शनाने व मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी या सत्काराचे आयोजन केले होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस माँ जिजाऊ, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी प्रमुख वक्ते पंजाबराव देशमुख, गुंजकर, दांडगे, इंगळे, अनंता धामोळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सत्कार कार्यक्रमास जानराव देशमुख, माजी जि. प. सदस्य सीमा ठाकरे, कृउबासचे माजी प्रशासक पंजाबराव देशमुख, दांडगे, गोंदकर, सरपंच तालुका संघटनेचे अध्यक्ष गणेश ताठे, समाजसेवक अनंता रामोळे, मुख्याध्यापक इंगळे, वाडीचे सरपंच विनोद मिरगे, सचिव निखिल देशमुख, मंडळाचे अध्यक्ष शैलेश चोपडे, उपसरपंच विजय बोर्डे, ग्रा. पं. सदस्य डांबरे, तांगडे, कोलते, अजय खोदरे, शिवा सपकाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. . तर सूत्रसंचालन संभाजीराव टाले यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...