आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर पालिकेच्या वतीने नाल्यांमधील गाळ उपसा अनेक महिन्यांपासून करण्यात आलेला नाही. त्यामुळे सर्व्हिस लाइन मधील नाल्या तुंबल्या असून, सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. नाल्यामध्ये कचरा साचल्यामुळे या भागात डासांचा प्रकोप वाढला आहे. यामुळे सरस्वती नगरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या भागात कचरा उचलणाऱ्या गाड्यांचे दर्शनच झाले नसल्याचे या भागातील नागरिक सांगतात. तरी नाल्यातील गाळ उपसा लवकरात लवकर करावा अन्यथा सरस्वती नगर वासीय आंदोलन करतील इशारा पालिका प्रशासनाला नागरिकांनी दिला आहे. मागील अनेक महिन्यापासून नगर पालिकेच्या वतीने या भागातील सांडपाणी वाहुन नेणाऱ्या नाल्यातील गाळ उपसा झालेला नाही. त्यामुळे या भागातील नाल्या तुंबल्या असून, नाल्यातील दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर पसरत आहे. घंटागाड्या नियमित येत नसल्यामुळे कचरा संकलन नियमित होत नसल्याने नाल्यात कचरा टाकण्यात येत आहे. त्यामुळे सर्वत्र दुर्गंध पसरली असून, डासांचा प्रकोप वाढला असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परंतु, नगर पालिकेला कोणतेच सोयरसुतक नसल्याचे चित्र आहे. अनेक वेळी या भागातील नगरसेवकांना सूचना देऊनही या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. पावसाळा तोंडावर असून, गाळ उपसा न झाल्यास नागरिकांच्या घरात नालीतील पाणी शिरण्याची भीती व्यक्त होत आहे. तरी या भागातील नाल्यांमधील गाळ उपसा करावा, अन्यथा आंदोलनाचा करू, असा इशारा दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.