आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परंपरा:आज गौरीपूजन; नैवेद्यासाठीची भाजी तर फुलांचे भाव वधारले

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठागौरीचे शनिवारी सर्वत्र आगमन झाले असून, रविवारी गौरी पूजनानंतर नैवेद्य दाखवून प्रसादासाठी भक्तांना आमंत्रित करण्याची परंपरा आहे. ही परंपरा जोपासण्यासाठी महिलांनी शनिवारीच व्यवस्था केली असून, बाजारात भाजीसह इतर खरेदी केली. सणानिमित्त मात्र आज बाजार महागला होता.

ज्येष्ठागौरी पूजनासाठी ३२ भाज्या व पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो. यात अंबाडी, चक्री, दोडका, काशीफळ, भेंडी, गवार, चवळी, पालक, मेथी, आंबटचुका, शेपू, वालाच्या शेंगा, पडवळ, शिरी दोडका, मूग व उडदाच्या शेंगा, शेवगा, टमाटर, भोपळा, कच्चे टमाटे आदी प्रकारच्या ३२ भाज्यांची विक्री केली जाते. या निमित्त बाजारात फुलांचे दरही कडाडलेले होते. अनेकांनी फुलांच्या हाराला पसंती दिली होती. बुलडाणा शहरात या निमित्त विविध ठिकाणावरून भाजीपाला सकाळी हर्रासीत विक्रीला आला होता. मात्र यावेळी शेतकऱ्यांपेक्षा दलालांनाच जास्त फायदा झाल्याचे दिसून आले.बुलडाणा येथील भाजी विक्रेते हरिभाऊ जाधव यांनी सांगितले की, गौरी पूजनानिमित्त नैवेद्यासाठीचा पुडा ४० रुपयांत विक्रीसाठी उपलब्ध होता. नैवेद्यासाठी लागणारी केळीची तीन पाने २० रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होती.

बातम्या आणखी आहेत...