आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापोलिसांनी नाकाबंदी करून एक गावठी पिस्तुलासह चार जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका आरोपीस ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून एक गावठी पिस्तुल, चार जिवंत काडतुस, दुचाकी असा एकूण ८२ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. ही कारवाई तालुक्यातील एकलारा ते काटेल फाट्याजवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.
तालुक्यातील टुनकी बावनबीर मार्गे लाल रंगाच्या एम एच २८ /ए.वाय / ९५५७ या क्रमांकाच्या दुचाकीने शेगावकडे जाणार्या एका व्यक्तीजवळ गावठी बनावटीचे पिस्तुल व जिवंत काडतूस असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. काही वेळानंतर आरोपी रामलाल फुदसींग डूडवा वय २४, रा.निमखेडी यास थांबवून त्याची झडती घेतली असता त्याच्या पॅण्टमध्ये देशी बनावटीचे पिस्तुल व चार जिवंत काडतूस आढळून आले. प्रकरणी स्थागुशाचे पोलिस नायक युवराज तातुबा राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरुन आरोपी रामलाल फुदसींग डुडवा यास ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक सचिन कानडे, पोहेकॉ रामकुमार राजपूत, पो.ना.गजानन दराडे तसेच हिवरखेडचे पोलिस ठाण्याचे पो.ना. गजानन आहेर यांनी केली. दरम्यान, आज आरोपीस येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास तामगावचे ठाणेदार प्रमोद उलेमाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दीपक सोळंके हे करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.