आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामेळावा:बुलडाणा येथे रविवारी शासकीय सेवा योजनेचा महामेळावा

बुलडाणा5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बुलडाणा, जिल्हा वकील संघ आणि जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा च्या वतीने पॅन इंडियाअंतर्गत नागरिकांचे सक्षमीकरण आणि हक हमारा भी तो है, या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रविवार, १३ नोव्हेंबर रोजी समाज कल्याण कार्यालय, बुलडाणायेथे विविध शासकीय सेवा योजनेच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या महामेळाव्यात शासनाच्या विविध विभागांमार्फत सेवा योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्यात येणार आहे. त्या दिवशी महामेळाव्यात संजय गांधी निराधार योजना, इंदिरागांधी नॅशनल ओल्ड पेंशन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेंशन योजना, इंदिरा गांधी दिव्यांग पेंशन योजना, राष्ट्रीय कुटुंब योजना, आम आदमी विमा योजना,उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, रेशन कार्ड मतदान ओळखपत्र, प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, आधार कार्ड,आयुष्यमान भारत योजना, प्रधानमंत्री जिवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेंशन योजना, जन-धन योजना, प्रधानमंत्री जीवनज्योतीयोजना, अटल पेंशन योजना, पारधी घरकुल योजना, शैक्षणिक योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना, ज्येष्ठ नागरीक व दिव्यांगांसाठी पास सवलती, व्हीलचेअर,स्कक, बचत प्रमाणपत्र, इ. योजनांचा लाभ देण्यात येणार आहे.

या महामेळाव्यात शासकीय योजनांच्या लाभ मिळण्याकरता पात्र लाभार्थ्यांची प्रातिनिधीक स्वरूपात नोंद करण्यात येणार आहे. तसेच सर्व लोकांनी या मेळाव्याचा लाभघ्यवा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्नील चं. खटी, जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्या. हेमंत एस.भुरे, वकील संघाचे अध्यक्ष विजय सावळे, सचिव अमर इंगळे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...