आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधान घरकुल योजनेंतर्गत बांधून पूर्ण झालेल्या घरांचे हप्ते मिळत नसल्याने संतप्त लाभार्थीनी आज, दि. १० मार्च रोजी नगरपालिकेवर मोर्चा काढला. यावेळी प्रशासनाच्या वेळकाढू धोरणाचा निषेध करून हप्ते त्वरित मिळावेत, यासाठी अधिकाऱ्यांना त्यांनी निवेदन दिले. शहरात पंतप्रधान घरकुल योजनेंतर्गत नगर पालिकेच्या माध्यमातून सन् २०१८ मध्ये घरकुल बांधण्यास परवानगी देण्यात आली. जवळपास ८०० लाभार्थीनी यासाठी पालिकेकडे रितसर अर्ज केले. त्यापैकी १४० घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले असून शेकडो घरांचे बांधकाम अद्याप राहिले आहे.
मात्र, १४० लाभार्थीना शेवटच्या चौथ्या हप्त्याची ७५ हजार रुपयांची रक्कम दोन वर्षे उलटूनही शासनाकडून प्राप्त झाली नाही. त्यामुळे संतप्त लाभार्थींनी आज पालिकेवर मोर्चा काढला. घरकुलांचे थकीत हप्ते त्वरित अदा करावेत, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. भाजपचे कार्यकर्ते संदीप मेहेत्रे यांच्या माध्यमातून घरकुल लाभार्थींनी काढलेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक व महिलांनी सहभाग घेतला. दरम्यान,हप्ते लवकर मिळावेत यासाठी सरकारकडे पाठपुरावा करत असल्याचे मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांनी मोर्चेकऱ्यांना सांगितले. १५ दिवसांत रक्कम न मिळाल्यास पालिकेवर पुन्हा मोर्चा काढणार असल्याचा इशारा यावेळी संदीप मेहेत्रे यांनी दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.