आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपला लढा विचारसरणीशी, ही विचारसरणी ज्या उकिरड्यावरुन आली तो मुक्त करायचा आहे. हिंदूंनी मातृतीर्थ जिल्ह्यात अशा मुली जन्माला येऊ द्याव्यात ज्या जिहादच्या विरोधात पेटून उठल्या पाहिजेत. जिल्ह्यात जिहादचे पोषण करु नका, असे आवाहन हिंदू राष्टृसेना प्रमुख धनंजय देसाई यांनी केले.
येथील शिवालय येथे गोमातेचे पूजन करुन हिंदू जनआक्रोश महामोर्चाला सुरुवात करण्यात आली. संगम चौक, जयस्तंभ चौक, जिल्हाधिकारी कार्यालयामार्गे निघालेल्या या मोर्चाचे क्लब ले आऊटच्या रस्त्यावर सभेत रुपांतर झाले. या मोर्चात धनंजय देसाई, अटल पांडे, भाजप प्रदेश प्रतिनिधी विजयराज शिंदे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख सिंधूताई खेडेकर, उषा पवार, सिद्धार्थ शर्मा आदी सहभागी झाले होते.
मोर्चाला संबोधित करतांना धनंजय देसाई म्हणाले की, देहाच्या यातना कमी असतात पण महापुरुषांच्या बाबत बोलताना यातना अधिक असतात. मूळ भुमीपुत्राला आपल्याच धर्माच्या रक्षणार्थ बाहेर यावे लागत आहे. आम्हाला बराचसा इतिहास चुकीचा सांगितला आहे. तो बदलावा लागेल, असे ते म्हणाले. यावेळी बाबुराव वाघ, संतोष गहेरवाल, ज्योत्स्ना नागरे यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक किरण शिंदे, संचालन अमोल अंधारे यांनी केले. भाग्यश्री मोहिते यांनी मुलींना धर्म शिकवणे आवश्यक आहे. जो माणूस मेल्यावर धर्म सोडत नाही तो धर्मवीर आहे, असे सांगितले. कादंबरी ढमाळ या बालिकेनेही मार्गदर्शन केले.
इतिहास लक्षात घ्या, लव जिहाद होणार नाही
ज्या देशात ऐंशी टक्के हिंदू समाज आहे त्या हिंदूला एकवीस टक्क्यांविरुद्ध मोर्चा काढावा लागत आहे. याला कारण आहे की आपल्याला अहिंसेचा मार्ग शिकवला गेला होता. मात्र धर्मासाठी हिंसा ही ग्राह्य आहे. आपल्या पूर्वजांचा इतिहास आहे. हिंदू समाजातील नागरिकांनी जातीपाती सोडून हिंदुत्वासाठी एकत्र यावे. सरकारच्या भरवशावर राहू नका. आमच्या महिलांनी बलिदान दाखवल्याचा इतिहास आहे ते कोणी दाखवले नाही. हा इतिहास लक्षात घेतला तर आजच्या तरुणी लव जिहादला बळी पडणार नाही, असे अटल पांडे म्हणाले.
धर्मांतर विरोधी कायदा होणार
धर्मांतर विरोधी कायदा महाराष्ट्रात येणार आहे. त्याचा मसुदा तयार करणे सुरू आहे. गोवंश कायदा मुळाशी कसे जाता येईल हे बघणे आहे. गो मातेचे रक्षण करण्यासाठी येळगाव जवळ आपण जागा मागितली आहे. ती मिळाल्यास रस्त्यावर फिरणाऱ्या गायींना तेथे स्थान मिळेल व दूध, दही तुपाचे उत्पादनही घेता येईल. यापुढे थोर पुरुषांच्या अपमान केला तर शाब्दिक उत्तर देणार नाही. जिल्ह्यात लव जिहाद ठेचल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा आ. संजय गायकवाड यांनी दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.