आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवास मारण्याची धमकी:पाच लाख रुपये दे, नाहीतर खल्लास करेल ; अज्ञाताकडून फोनकॉलद्वारे धमकी

शेगाव25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील एका प्रतिष्ठित व्यक्तीस अज्ञात व्यक्ती कडून फोन कॉल तसेच सोशल मीडिया द्वारे पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे. पैसे न दिल्यास तुला खल्लास करेल अशी धमकी मिळाल्याची घटना २४ ऑगस्ट रोजी घडली.याबाबत येथील गुजराती सोसायटी मधील रहिवासी शंकरलाल उर्फ बबन लीलाधर भुतडा वय ६१ यांना २४ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास त्यांचे मोबाईल वर ९३७०८२५६५३ या मोबाइल क्रमांकावरून एका अनोळखी व्यक्तीने फोन करून तुम्ही शंकरलाल उर्फ बबन भुतडा आहात काय, असे विचारणार केली. त्यावर भुतडा यांनी हो असे त्यास म्हटले असता त्याने मला तुमच्याकडून पाच लाख रुपये पाहिजेत कधी आणि कसे देता ते सांगा. त्यावर भुतडा यांनी त्या व्यक्तीस तुमचे नाव काय आहे आणि कशाचे पैसे पाहिजे असे म्हटले असता त्याने जास्त चौकशी करू नकोस पैसे दे नाहीतर तुला खल्लास करून टाकेल, अशी धमकी देऊन फोन बंद केला.

त्यानंतर त्याच दिवशी या नंबर वरून नऊ वेळा कॉल आले ते शंकरलाल भुतडा यांनी उचलले नाहीत. त्यामुळे सदर व्यक्तीने भुतडा यांचे व्हॉट्सॲप क्रमांकावर ९३७०८२५६५३ व ७३५९०१९८१८ या या क्रमांकावरून अशाच प्रकारच्या धमक्या देण्यात आल्या तसेच तक्रार पोलीस स्टेशनला दिली तर मी आत जाण्यापूर्वी तू वर जाशील तुला जीवाने मारून टाकेल अशी धमकी दिली आहे. यामुळे सदर व्यक्ती कडून विनाकारण त्रास देण्यात आल्याने शंकरलाल भुतडा यांनी २६ ऑगस्ट रोजी याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे. परंतु धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध पोलिसांकडून घेण्यात आला नसून माझी तक्रार दुर्लक्षित करण्यात आली आहे. माझे जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी यात लक्ष घालावे आणि मला धमकी देणारा सबंधित व्यक्ती कोण आहे त्याचा शोध घेऊन त्याचेवर कार्यवाही करावी, अशी मागणी शंकरलाल भुतडा यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...