आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाभार्थ्यांचा सन्मान:शासकीय योजना प्रभावीपणे राबवून गरजूंना न्याय द्या ; माजी मंत्री आ. डॉ. शिंगणे

सिंदखेडराजा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शासकीय योजना राबवण्यात येत आहे. या योजनांची संबंधितांनी ग्रामीण भागात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. तसेच पात्र लाभार्थ्यांना त्यातून लाभ मिळवून द्या, असे, आवाहन माजी मंत्री आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले. १६ ऑगस्ट रोजी महाआवास अभियान २.० सन २०२१-२२ अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या केंद्र व राज्य पुरस्कृत योजनेमध्ये प्रत्येकी तीन ग्रामपंचायती आणि केंद्र व राज्य पुरस्कार योजनेत उत्कृष्ट घरकुल बांधकाम करणाऱ्या प्रत्येकी तीन लाभार्थीचा सन्मान आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी डॉ. श्रीकृष्ण वेणीकर, पंडितराव खंडारे, मधुकर गव्हाड, जगनमामा सहाने, सतीश काळे, रामदास कहाळे, नारायण किंगरे, मनोहर गव्हाड उपस्थित होते. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कार्यकारी अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण गृहनिर्माण कक्ष, पंचायत समिती सिंदखेडराजाच्या वतीने हा सन्मान सोहळा आयोजित केला होता. तालुक्यातून उत्कृष्ट कामगिरीसाठी ग्रामपंचायत जांभोराचे सरपंच व सचिव यांना प्रथम तर दुसरा क्र. साखरखेर्डा व तिसऱ्या क्रमांकासाठी ग्रामपंचायत पळसखेड यांना सन्मानित केले.

त्याचप्रमाणे राज्य पुरस्कृत योजनेमध्ये तालुक्यातून उत्कृष्ट कामगिरीसाठी ग्रामपंचायत सवडत यांना प्रथम पुरस्कार दिला. तर अनुक्रमे दुसऱ्या साखरखेर्डा व तिसऱ्या क्रमांकासाठी ग्रामपंचायत दुसरबीडचे सरपंच व सचिव यांना सन्मानित केले. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये तालुक्यातून उत्कृष्ट घरकुलाचा प्रथम पुरस्कार जांभोरा येथील लाभार्थी सज्जनराव खरात, द्वितीय देऊळगाव कोळ येथील उषा गायकवाड तर तृतीय सोनोशी येथील परशराम सोळंके यांना प्रदान केला. राज्य पुरस्कृत योजनेमधून उत्कृष्ट घरकुलाचा प्रथम पुरस्कार राजेगाव येथील योगिता संतोष मोरे, द्वितीय भंडारी येथील भगवान भास्कर मोरे तर तृतीय देऊळगाव कोळ येथील जिजा नामदेव भालेराव यांना प्रदान केला. याप्रसंगी घरकुल विभागाचे डाटा एन्ट्री ऑपरेटर विशाल लिहिणार यांचाही सत्कार केला. प्रास्ताविक अंकुश म्हस्के यांनी केले. सूत्रसंचालन दराडे यांनी तर आभार बी. जी. घुगे यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...