आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आक्रोश:‘शाळा द्या, नाही तर दाखले तरी द्या’ ; पंचायत समिती कार्यालयातच चिमुकल्यांचा ठिय्या

शेगाव12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने शिक्षणाचा हक्क दिला आहे. शिक्षा अभियाना अंतर्गत शाळांना अनुदान देत इमारती, वर्ग खोल्या, शैक्षणिक साहित्य यासह भौतिक सुविधा दिल्या गेल्या आहेत. परंतु स्थानिक प्रशासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ग्रामीण भागातील शिक्षणाचे तीन तेरा वाजले आहेत. याच कारणांमुळे येथील जिल्हा परिषद शाळा या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, शिक्षण वाचवा देश वाचवा या उद्देशाने आज देशाचे भवितव्य असलेल्या विद्यार्थ्यांची आज शाळा खोली अभावी शेगाव येथे शिवाजी चौकातून पंचायत समिती कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शाळा द्या नाही तर दाखले द्या, शिक्षण वाचवा देश वाचवा असा आक्रोश करत विद्यार्थ्यांसह व पालकांनी शासनाप्रती रोष व्यक्त करीत मोर्चा काढून पंचायत समिती कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.

येथील पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या गोळेगाव बु. येथील जि.प.शाळा वर्ग खोली आणि अंगणवाडी तीन-चार वर्षांपासून जीर्ण झाली आहे. मुख्याध्यापक एस.एस.पिलात्रे, अंगणवाडी सेविका माया गव्हाळे यांनी वेळोवेळी नवीन इमारत मिळणे बाबत पाठपुरावा केला आहे. परंतु अद्याप ही इमारती मंजूर झालेले नाही.

त्यामुळे गोळेगाव बु. येथे चार वर्ग एकाच खोलीत भरत आहेत तर अंगणवाडी देखील दोन वर्षापासून भाड्याच्या खोलीमध्ये भरत आहे. तसेच शाळेला संरक्षण भिंत नसल्यामुळे शाळेच्या परिसरात मोकाट जनावरांचे वास्तव्य असून दुर्गंधीयुक्त कचरा देखील आहे. यापूर्वी १० ऑक्टोबर २०२१ रोजी जि.प.सदस्य राजाभाऊ भोजने यांनी सदर कामाचे भूमिपूजन सुद्धा केले होते. परंतु ही वर्ग खोली गोळेगाव बु.ऐवजी येथील कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे गोळेगाव खु. येथे झाल्याने गोळेगाव बु. येथील ती मंजुरी रद्द झाली. यापुर्वी देखील पालकांनी १२ मार्च रोजी शाळेला दहा दिवस कुलूप ठोकले होते. परंतु गटशिक्षणाधिकारी यांच्या आश्वासनानंतर शाळा पूर्ववत सुरु करण्यात आली होती. त्यामुळे बांधकाम काय गोड बंगाल आहे याचा प्रश्न निर्माण झालेला आहे.

बातम्या आणखी आहेत...