आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुलडाणा:युथ वर्ल्ड आर्चरी चॅम्पियनशीपमध्ये भारताने जिंकले सुवर्ण, बुलडाण्याचा मिहीर अपारने फडकविला विजयाचा झेंडा, पोलंड येथे सुरु होती स्पर्धा

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धा पोलंड येथे १४ ऑगस्ट रोजी पार पडली आहे. या स्पर्धेत अमेरिका संघावर मात करत भारताच्या टीमने सुवर्ण पदक पटकाविले आहे. अमेरिकेसोबत झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचे खेळाडू कुशल दलाल हरियाणा, साहील चौधरी उत्तर प्रदेश व संघाचे नेतृत्व करणारा बुलडाण्याचा मिहीर नितीन अपार हे सामील होते.

अमेरिकन संघाला पराभूत करत ही टीम सुवर्ण पदकाची मानकरी ठरली. हा सुवर्णवेध मिळविण्याचा मान बुलडाण्याचे सुपुत्र मिहीर अपार या १६ वर्षाच्या खेळाडूने मिळविला. तिरंदाजी स्पर्धेसाठी मिहीर अपार याला प्रशिक्षक चंद्रकांत इलग यांचे मार्गदर्शन लाभले. मिहीर अपार याने लहानपणापासूनच आजोबा जयभारत अपार यांचेकडून धनुर्विदयेचे धडे घेतले होते. तर आई वडिलांनी त्याला खेळाच्या मैदानावर टिकवून ठेवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले. मिहीरची आई जया नितीन अपार ही बुलडाणा तालुक्यातील ऊमाळा येथे जिल्हा परिषद शिक्षिका तर वडीलही शिक्षकच आहेत. मिहीरच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बातम्या आणखी आहेत...