आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंतिम सामना ठरला रोमहर्षक:बुलडाणा आयडॉल स्पर्धेचा विजेता ठरला बुलडाण्याचा गोपाल गावंडे; पाच जिल्हयात रंगली होती स्पर्धा

बुलडाणा18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित बुलडाणा आयडॉल स्पर्धेचे विजेतेपद गोपाल गावंडे यांनी पटकावले. तृप्ती डोंगरे व गोपाल गावंडे यांच्यात अटीतटीचे सादरीकरण झाले. स्पर्धेचे उपविजेतेपद तृप्ती डोंगरे यांनी पटकावले. तृतीय क्रमांक महेंद्र रूपनारायण यांनी पटकावले. बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात बुलडाणा आयडॉल ही स्पर्धा ठेवण्यात आली होती.

सेमी फायनल मध्ये तब्बल १९ स्पर्धक पात्र ठरले होते. या एकोणीस स्पर्धकांना अंतिम सामन्यासाठी बुलडाणा येथील बुलडाणा अर्बन च्या ऑडिटोरियम हॉल येथे आमंत्रित करण्यात आले होते. या ठिकाणी घेण्यात आलेल्या अंतिम सामन्यात विविध फेरीत परीक्षकांनी गायकास चाळणी लावली. पहिल्या फेरीमध्ये असलेले एकोणीस स्पर्धका पैकी दुस-या फेरीत १२ पात्र गायकांची निवड करण्यात आली. तिसऱ्या फेरीमध्ये केवळ १० गायक उरले होते. एकूण दहा गायकांना शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या कलागुणांचा प्रदर्शन केले. दर्जेदार संगीताची साथ, गायकांचा आवाज, सादरीकरण यामुळे खचाखच भरलेल्या हॉलमध्ये एकच उत्साह दिसून आला.

यावेळी गायकांनी एकापेक्षा एक सरस हिंदी, मराठी गाणे, भावगीत सादर करून उपस्थितांची दाद मिळविली. परीक्षकांनी लावलेल्या नियम आणि चाचणीत अखेर गोपाल गावंडे यांची वर्णी लागली. तर प्रोत्साहन पर पुरस्कारासाठी तनुश्री भालेराव, प्रज्ञा धांडे, अनुराधा धोरण, अविनाश नावकर, भगवान बाभुळकर, शब्बीर बेग, स्वप्नील आराख इत्यादींना पुरस्कार वितरित करण्यात आला.

या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष राधेश्याम चांडक, चीफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. सुकेश झंवर, तिरुपती मंदिराचे अध्यक्ष अरुण दिवटे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर जोशी, गजानन धांडे यांनी केले. सांस्कृतिक कला मंदिर अकोला येथील कलाकार तृप्ती दिनकर यांनी यावेळी नृत्य सादर करीत जोरदार टाळ्या मिळवल्या तर अनंत देशपांडे यांनी गायलेले लता मंगेशकर यांचे राम लखन या चित्रपट बडा दुख दिना तेरे लखनने या गाण्याने कार्यक्रमाला वेगळ्याच उंचीवर नेले. या गाण्याला रसिकाने प्रचंड टाळ्यांनी प्रतिसाद दिला.

बातम्या आणखी आहेत...