आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील जळगाव-पाचोरा राज्य महामार्गालगत असलेल्या गोराडखेडा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत अज्ञात चोरट्यांनी दगडाने तीन शाळा खोल्यांचे दरवाजे तोडून तीन टीव्ही संचाची चोरी केली. मात्र त्यापैकी एक टीव्ही संच शाळेच्या आवारातच सोडून दोन संचासह पसार झाल्याची घटना साेमवारी उघडकीस अाली. शाळेचे मुख्याध्यापक गुणवंत पवार यांनी पाचोरा पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला. रविवारी रात्री एक ते दीड वाजेच्या दरम्यान ही चोरी झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. घटनास्थळी फिंगरप्रिंट तज्ञ व श्वानपथकास पाचारण करण्यात आले होते. मात्र श्वानाने शाळेचा परिसर व जवळ असलेल्या जिनिंग फॅक्टरीपर्यंत माग घेतला व तेथून माघारी फिरला. अतिशय वर्दळीच्या ठिकाणी गोराडखेडा जि.प. शाळा असून शनिवारी सकाळी अकरा वाजता शिक्षक शाळेला कुलूप लावून घरी गेले.
रविवारी, सोमवारी होळी सणाची सुटी होती. त्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी रविवारी पहाटे एक ते दीड वाजता शाळेच्या मागील बाजूने प्रवेश केला व शाळेच्या कुलूप असलेल्या तीन खोल्यांचा कडी काेंडा, दरवाजा दगडाने तोडला. तेथील सॅमसंग कंपनीचे मुलांना शिक्षण घेता येणारे टीव्ही संच चोरून व त्यातील एक संच शाळेच्या आवारातच सोडून ३० हजार रुपये किमतीचे दोन संच चाेरून नेले. शाळेचे रेकॉर्ड अस्ताव्यस्त फेकले हाेते. गावातील काही शेतकरी मध्यरात्री शेतात जात असताना त्यांना शाळेत काहीतरी ठोकण्याचा आवाज आल्याने त्यांनी मुख्याध्यापक पवारांना कळवले. मुख्याध्यापक पवार, उपनिरीक्षक प्रदीप पाटील, दीपक धनगर यांनी पहाटे सहा वाजता शाळेत जावून पाहणी केली असता चाेरीचा हा प्रकार उघडकीस आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.