आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील शेती जोडव्यवसाय करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करणारी जिल्हा दूध उत्पादक संघाचे कार्यालयच दोन वर्षांपासून बंद पडले आहे. त्यातच शासकीय संस्थाही बंद पडल्या असून त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास दररोज ५० हजार लिटर दूध इतर जिल्ह्यात जात आहे. बंद पडलेल्या दूध केंद्राचे दूध अखेर जालना येथे पाठवले जात होते. ते सुद्धा आता बंद आहे. बुलडाणा जिल्ह्यात लहान-मोठे गाय व म्हैस वर्गीय जनावरांची संख्या सहा लाख १६ हजार ३९८ इतकी आहे. यामध्ये म्हैस वर्गीय एक लाख ३८ हजार १८२ जनावरे असून गायींची संख्या चार लाख ७८ हजार २१६ इतकी आहे. ही पशुगणना दहा वर्षांपूर्वीची असल्याने यात वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे. मात्र या पशुधनामुळे जिल्ह्यात शासनाने नांदुरा येथे दुधासाठी शासकीय योजना राबवून शीतकरण केंद्र उभारले होते. दुसरे शीतकरण केंद्र चिखली येथे उभारले होते.
या दोन्ही केंद्रावरून दूध परजिल्ह्यात किंवा जिल्ह्यातच विक्री होत होती. जिल्हा दूध उत्पादक संघाच्या माध्यमातून हे दूध बुलडाण्यातही मिळत होते. आता हजारो लिटरने मिळणारे हे दूध २०२२ मध्ये फक्त १,६८४ लिटर इतके उपलब्ध झाले होते. खासगी क्षेत्रात मात्र दुधाला चांगला भाव मिळत असल्याने हेच दुध आता जिल्ह्याबाहेर जात असून बाहेरचे १८ हजार लिटर दूध पिशव्यांद्वारे बुलडाणा जिल्ह्यात येत आहे. देऊळगाव राजा येथेही तालुका दुध उत्पादक संघ होता. त्या माध्यमातूनही दूध बाहेर विक्रीस जात होते. सध्या जिल्ह्यातील शीतकरण केंद्र २०२० पासून बंद पडल्याने ही अवस्था झाली आहे.
आताची परिस्थिती अशी
मलकापूर भागातील मदर डेअरी मार्फत प्रतिदिन २३ हजार ५०० लिटर दूध गोळा होत आहे. इतर चार संस्थामधील दोन हजार ५८० लीटरचाही यात समावेश आहे. अमर बोदवड संस्थेकडून १५ हजार, दुसरबीड ग्रीनपल २००० लिटर दुधाचे संकलन करत आहे. तर बुलडाण्यात पिशवीबंद मध्ये विकास कडून ६००० लिटर राजहंस कडून दोन ते अडीच हजार लिटर अमरकडून सात ते साडेसात लिटर दूध बुलडाण्यात येत आहे. यात दूध उत्पादनेही बुलडाण्यात येत आहे.
भाव मिळत नसल्याचा परिणाम
दूध उत्पादकांच्या दुधाला गायीचे दूध व त्याचे फॅट ३.५ तसेच एस एन एस ८.५ असल्यास २५ रुपये व म्हशीचे दुधाचे फॅट ६ व एस एन एस ९ असल्यास ३४ रुपये भाव मिळतात. त्यामुळे खासगी दूध संकलन केंद्राकडे दूध उत्पादकांचा कल वाढला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.