आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साबांविची अनास्था:शासकीय निवासस्थाने भग्नावस्थेत; डागडुजीसाठी भ्रष्टाचाराचे ‘सिमेंट”

बुलडाणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पूर्वी कर्मचारी शोधायचे निवासस्थान, आता बंगलेही पडले ओस

सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत बांधण्यात आलेल्या शासकीय निवासस्थानांची भग्नावस्था झाली असून याला बांधकाम विभागाची अनास्था कारणीभूत असल्याचे बोलल्या जात आहे. आधी कर्मचारी शासकीय निवासस्थाने शोधत असायचे पण आता निवासस्थाने कर्मचारी केव्हा येतात या प्रतिक्षेत आहेत. बंगलेही ओस पडत चालले असतानाही सध्या बांधकाम विभाग डागडुजीचा कारभार करत आहे, त्यामुळे या डागडुजीला भ्रष्टाचाराचे सिमेंट तर लागले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. बुलडाणा हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. परंतु, येथे रेल्वे नाही. त्यामुळे बहुतांश अधिकारी येथे येण्यास पसंती दर्शवत नाही.

जिल्ह्याचे ठिकाण म्हटल्यानंतर सर्वच शासकीय कार्यालय या ठिकाणी आहेत. शासकीय कार्यालये बहुतांश असल्याने शासकीय वसाहती ही असणे आवश्यक आहे. त्यानुसार तशा शासकीय वसाहतींचे काम काही वर्षापूर्वी पडत होते. शासकीय निवासस्थानात राहणे एक अभिमानाचे वाटत होते. मात्र आता काळानुसार शासकीय निवासस्थाने बदलले नाही. जी निवासस्थाने आहे त्यांची दुरावस्था झाली आहे. बुलडाणा शहरात कर्मचारी वसाहत करुन राहिले पाहिजे म्हणूनच निवासस्थाने बांधण्यात आली होती. ही सर्व निवासस्थाने शासकीय कार्यालयाच्या जवळपासच आहेत. या निवासस्थानांमध्ये आता मोजकेच कर्मचारी राहत आहे. काही वसाहतीत तर एकही कर्मचारी दिसून येत नाही. काही निवासस्थानात अर्धीच निवासी राहिली आहेत. अशी ही अवकळा आल्यानंतरही डागडुजी करण्याची बांधकाम विभागाची प्रबळ इच्छा दिसून येत आहे.

न राहण्यामागे कारणे
अधिकारी बदलून आले म्हणजे त्यांना राहण्यासाठी बंगल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु, आता अधिकारी स्वतःच भाडयाच्या टु बीएचके, थ्री बीएचके, बंगलोजमध्ये राहतात. काही शासकीय बंगले राजकीय लोकांच्या ताब्यात आहेत. आता जुन्या बंगल्यात राहण्यापेक्षा नवीन व्यवस्था अधिकारी शोधत आहेत. कर्मचारी निवासस्थाने राहण्यासारखी नाही. त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची अडचण, स्वच्छतेची अडचण आहे. परंतु, जुन्या कर्मचाऱ्यांनी निवासस्थाने अजुनही सोडली नाही. त्यांनी गरजेनुसार निवासस्थानापेक्षा वापरण्यासाठी टीनपत्रे टाकून आपल्या वाढत्या कुटुंबाची व्यवस्था केली आहे.

घन कचऱ्याचा बोजवारा
जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या बंगल्यासमोर शासकीय वसाहतींच्या घन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी मोठा हौद बांधण्यात आला आहे. या हौदात सुका व ओला कचरा अशी सोय करण्यात आली आहे. मात्र या कचऱ्याची विल्हेवाट लावली नसून त्यात आता डासांचा उपद्रव वाढला आहे.

पाटबंधारे वसाहत रिकामी
पाटबंधारे वसाहत शहरात २ ठिकाणी आहे. एक अधिकार्यांची वसाहत मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद यांच्या बंगल्याला लागून आहे. दुसरी पाटबंधारे विभागाजवळ आहे. या दोन्ही निवासस्थानांची अनावस्था झाली आहे. त्यामुळे कर्मचारीही कमीच राहतात. एका वसाहतीतील एकही निवासस्थानात अधिकारी राहत नाही. ओसाड पडत चाललेल्या या वसाहतीत सध्या डागडुजीचे काम सुरु आहे.

या ठिकाणी आहे वसाहती
स्टेट बँकेच्या मागे व तहसील कार्यालयाच्या बाजुला, पाण्याच्या टाकीजवळ, जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या निवासस्थानापासून पुर्णपणे वेढा घालत रामकृष्ण आश्रम पर्यंत आहेत. येथून पुढे जिल्हाधिकारी यांचा बंगला आहे. सर्क्युलर रस्त्यालगत ही निवासस्थाने आहेत. प्रबोधन शाळेच्या बाजुला. या शिवाय पोलिस वसाहती आहेत. अशा या वसाहती शहरात उभ्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...