आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा सुधारित वेतन मंजुरीच्या प्रस्तावांसाठी अनेक बैठका घेतल्या. अनेक आंदोलनेही करण्यात आली. फाईल मंजुरीसाठी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ व राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सतत प्रयत्न व पाठपुरावा केला. मागील आठवड्यापासून हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी वित्त भागात फिरत होता. या प्रस्तावाचा अंतिम निर्णय करण्यासाठी व पाठपुरावा करण्यासाठी २ मे पासून सतत पाच दिवस मुंबईला कर्मचारी ठाण मांडून बसले. अखेर ५ मे रोजी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे सुधारित किमान वेतन मंजूर होऊन मंत्रिमंडळाच्या मान्यतेसह सादर करण्यात आला. त्यामुळे कोणत्याही क्षणी सुधारित किमान वेतनाचा निर्णय निघणार आहे. या निर्णयामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुधारित किमान वेतनाची फाईल वित्त विभागात ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या सततच्या पाठपुराव्यांमुळे ही फाईल वित्त विभागातून ग्रामविकास विभाग बांधकाम भवन येथे प्रत्यक्ष पाठवण्यात आली आहे. त्यामुळे सुधारित वेतन मिळण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतरच कोणत्याही क्षणी सुधारित वेतनाचा ग्रामविकास मार्फत शासन निर्णय निघणार आहे.
याबाबत महा विकास आघाडीचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, कामगार मंत्री बच्चू कडू यांचे राज्य युनियनचे वतीने आभार व्यक्त करण्यात आले. या फाइलचा पाठपुरावा राज्य अध्यक्ष व राज्य सरचिटणीस, राज्याचे कार्याध्यक्ष, सचिव, विविध पदाधिकारी व सहकाऱ्यांनी जिवाची पर्वा न करता केला आहे. राज्यातील २५ हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी ९ व १० मार्च रोजी काढलेल्या निर्धार मोर्चाचे फलित झाले आहे.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना न्याय मिळून देण्यासाठी राज्याचे सरचिटणीस गिरीश दाभाडकर, राज्य सचिव दिलीप डिके, नागपूर विभागीय अध्यक्ष अशोक कुथे, मराठवाडा विभागीय अध्यक्ष दयानंद एरंडे, अमरावती जिल्हा अध्यक्ष मंगेश ढोरे, हिंगोली जिल्हा अध्यक्ष संतोष शिंदे, वाशीम जिल्हाध्यक्ष दिगंबर सोनटक्के, नागपूरचे कोषाध्यक्ष कमलाकर गुडदे, फुलाजी इंगोले, औरंगाबाद जिल्हा सचिव गणेश भालेराव, व काकासाहेब कराळे सहकारी व पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी केलेल्या कामाचे यश आहे, अशी माहिती ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे राज्य संघटक रामेश्वर गायकी यांनी दिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.