आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजीनामा:राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा घ्यावा

खामगाव12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेले भगतसिंग कोश्यारी यांचे विधान अक्षम्य आहे, अशा व्यक्तीला महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालपदी राहण्याचा अधिकार नाही. एका संवैधानिक पदाच्या आडून अशा बेताल वक्तव्य करणाऱ्यांचा राजीनामा घ्यावा व महाराष्ट्राबाहेर हद्दपार करा, अशी मागणी २० नोव्हेंबर रोजी खामगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली.

यावेळी उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत राष्ट्रपतींना राजीनाम्या संदर्भात निवेदन देण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष देवेंद्र देशमुख, अंबादास पाटील,महेद्र पाठक, विकास चव्हाण, देविदास गोतमारे, विश्वनाथ झाडोकार, दिलीप पाटील, आकाश खरपाडे, रमाकांत गलांडे, अजीज खान, राजेंद्र वराडे, संजय गवई, जगन्नाथ देवकर, संतोष वाघमारे, ओम शेट्टे, सय्यद मोइऊद्दीन, प्रशांत धोटेट, नितेश खरात, मिर्जा अक्रम बेग, तालिफ शेख, नवल वानखडे, जयराम माळशिकरे, बंडू कनकवार, अजिम खान नसिमखान आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...