आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यपाल:राज्यपालांना पदावरून हटवण्यात यावे : मनसे

बुलडाणा13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल कोश्यारी यांना पदावरून तातडीने हटवण्यात यावे, अशी मागणी मनसेच्या वतीने एका निवेदनाद्वारे सोमवारी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे करण्यात आली.

निवेदनानुसार, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे राज्याची अस्मिता आहे. शिवरायांबद्दल कुणीही असे बेताल वक्तव्य करून अपमान करणे, ते निश्चितच निषेधार्ह आहे.

या बेताल व्यक्तव्याचा मनसेच्या वतीने निषेध करण्यात आला. राज्यपालांचे मानसिक संतुलन ठीक नसून ते राज्यासाठी धोकादायक आहेत. त्यामुळे असे बेताल वक्तव्य करणाऱ्या राज्यपालास पदावरून काढून टाकण्यात यावे, अशी मागणी मनसे तालुका अध्यक्ष पंकज पाटील, मनविसेचे तालुकाध्यक्ष गणेश जैस्वाल, शहराध्यक्ष निखिल पोंदे, दीपक जाधव, गजराज साळुंके, भूषण सुरंगे, कृष्णा चंदनशिव, शिवम कोळी, अजय मेंढे, किरण धोंगडे यांच्यासह असंख्य मनसे सैनिकांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...