आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंत्ययात्रा:केळवद येथे राज्यपालांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

बुलडाणा11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केळवद येथील ग्रामस्थांनी राज्यपालांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. ही अंत्ययात्रा स्मशानात पोहोचवण्यात आली..

राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी केळवद येथील ग्रामस्थांनी तिरडी धरली. केळवद बसस्थानक येथे तिरडीवर प्रतिकात्मक मृतदेह ठेवण्यात आला. तंटामुक्ती समिती अध्यक्ष नारायण वाणी यांनी तिरडी धरली. गणेश यंगड व इतरांनी तिरडीला खांदा दिला.

यावेळी नंदूआप्पा बोरबळे, बाजीराव उन्हाळे, गोपाल वाघमारे, श्रीकृष्ण गवते आदींनी निषेधाच्या घोषणा दिल्या. प्रताप पाटील, माजी सरपंच द्वारकाताई भोसले, ज्ञानदेव कालेकर, मीराताई आखाडे, अशोक मोहिते, धनराज पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख नंदूभाऊ कऱ्हाडे आदींनी अंत्ययात्रेत सहभाग घेतला. वाजत गाजत ही अंत्ययात्रा गावाबाहेरील स्मशानभूमीत पोहोचली. त्यानंतर शोकसभा घेण्यात आली. यावेळी नारायण वाणी, द्वारकाताई भोसले, नंदुआप्पा बोरबळे, बाजीराव उन्हाळे, प्रताप पाटील यांनी राज्यपालांविषयी संतप्त भावना व्यक्त केल्या.

बातम्या आणखी आहेत...