आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टूर ऑफ ड्युटी:‘केंद्र शासनाने टूर ऑफ ड्युटी नावाचा कायदा रद्द करावा’

शेगाव10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र शासनाने टूर ऑफ ड्युटी नावाची नवीन संकल्पना आणून त्यामध्ये सैन्याची फक्त चार वर्षांची नोकरी आमच्या समोर मांडली आहे. युवक सैन्यात भरती होण्यासाठी जीवाचे रान करीत आहेत. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी व देशाचे रक्षण व देशाची सेवा करण्यासाठी आम्ही तयारी करत असताना शासनाने हा निर्णय घेऊन युवकांवर अन्याय करून केंद्र शासनाने टूर ऑफ ड्युटी नावाची नवीन संकल्पना आणली आहे. त्यामुळे हा निर्णय मागे घेण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा असंख्य युवकांनी आज २० जून रोजी एका निवेदनाद्वारे तहसीलदारांना दिला आहे.

त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, चार वर्षाच्या या नोकरीने युवकांसह देशाचे फार मोठे नुकसान होणार असून देशातील लाखो तरुणांमध्ये या निर्णया विरुद्ध असंतोष पसरला आहे. देशाचे रक्षण व सेवा करणारे लाखो मुलांचे व मुलींचे स्वप्न या निर्णयामुळे धुळीस मिळाले आहे. शासनाने घेतलेल्या या निर्णयाचा सर्वंकष विचार करून हा निर्णय मागे घेवुन युवकांच्या भविष्याचा शासनाने विचार करावा.

जर हा निर्णय मागे घेतला नाही तर, युवा वर्ग रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा अर्पित तायडे, अजय कोकाटे, अजय गवई, गौरव गवई, रोशन गवई, संकेत गवई, अजय डोंगरे, प्रशिक शेगोकार, जयकुमार लोधी, संदीप डाबेराव, अजय शेगोकार, दिव्यशील बोदडे यांनी दिला आहे. सैनिक होण्याची मनीषा बाळगणारे युवक निवेदन देण्यासाठी तहसील कार्यालयात येणार असल्याने पोलिस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला होता.

बातम्या आणखी आहेत...