आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:ग्रा.पं. निवडणूक; मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

माहे जानेवारी २०२१ ते एप्रिल २०२२ मध्ये मुदत संपलेल्या, तसेच माहे मे २०२२ ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार जानेवारी २०२१ ते सप्टेंबर २०२२ पर्यंतच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी ३१ मे रोजी प्रसिद्ध मतदार यादी ग्राह्य धरावयाची आहे.

प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी १४ जून २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना असल्यास १४ ते १७ जून या कालावधीत दाखल करू शकणार आहेत. प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी २२ जून रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील माहे जानेवारी २१ ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत १३ ग्रामपंचायतीचा कालावधी संपुष्टात आला आहे.

या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणकीय प्रणालीद्वारे तयार करून प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी १४ जून रोजी ग्रामपंचायत, तलाठी सजा, मंडळ अधिकारी कार्यालय, पंचायत समिती कार्यालय व तहसिल कार्यालयाचे सुचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या मतदार यादीवर ज्या नागरिकांना हरकती व सुचना सादर करावयाच्या आहेत, त्यांनी १७ जून पूर्वी तहसीलदार यांच्याकडे सादर कराव्यात. याबाबतची नोंद सर्व नागरिकांनी घ्यावी, असे जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी कळवले आहे.

बातम्या आणखी आहेत...