आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी इम्पॅक्ट:ग्रा. पं.ने केली जलकुंभ परिसराची साफसफाई

मलकापूर पांग्रा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जलकुंभ परिसरात घाण साचल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात या मथळ्याखाली ‘दिव्य मराठी’ने २८ नोव्हेंबरच्या अंकात वृत्त प्रकाशित केले होते. उशीरा का होईना ग्रामपंचायत प्रशासनाने या वृत्ताची दखल घेत आज २१ डिसेंबर रोजी जलकुंभ परिसराची जेसीबीच्या साह्याने साफसफाई केली. सफाई झाल्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

जवळपास आठ हजार लोकसंख्या असलेल्या मलकापूर पांग्रा येथील नागरिकांना मुबलक व शुध्द पाण्याचा पुरवठा करण्यासाठी लाखो रुपये खर्च करून पाण्याची टाकी उभारण्यात आली होती. टाकीला सरंक्षण म्हणून थातूरमातूर लोंखडी जाळी लावण्यात आली होती. परंतु आता ही जाळी सडल्यामुळे डुकराचा मुक्त संचार सुरू झाला होता. डुकराचे कळपचे कळप घाण पाण्याच्या डबक्यात बसून राहत होते.

शिवाय या परिसराचा नागरीक लघुशंकेसाठी वापर करीत होते. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी सुटत होती. त्यामुळे टाकी शेजारील ग्रामस्थ कमालीचे त्रस्त झाले होते. या बाबत दैनिक दिव्य मराठीने २८ नोव्हेंबरच्या अंकात जलकुंभ परिसरात घाण साचल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. ग्रामपंचायत प्रशासनाने उशिरा का होईना या वृ्त्ताची दखल घेत आज बुधवारी जलकुंभ परिसराची जेसीबीच्या साह्याने साफसफाई केली आहे. साफसफाई झाल्यामुळे तेथील रहिवाशांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

जलकुंभाला संरक्षक भिंत बांधण्यात येईल
ग्रामपंचायत प्रशासनाने दैनिक दिव्य मराठीच्या वृत्ताची दाखल घेत आज बुधवारी जलकुंभ परिसराची जेसीबीच्या साह्याने साफसफाई करण्यात आली आहे. तसेच येत्या काही दिवसात जलकुंभ परिसरात संरक्षक भिंत बांधण्यात येईल. -बंडू उगले, सरपंच

बातम्या आणखी आहेत...