आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण:ग्रा. पं. निवडणुकीत पराभव सहन न झाल्याने एकास मारहाण

बुलडाणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुदत संपलेल्या तालुक्यातील दहा ग्रामपंचायतीसाठी १८ डिसेंबर रोजी शांततेत मतदान पार पडले. यावेळी कुठलीही अनुचित घटना घडली नाही. परंतु मंगळवारी झालेल्या मतमोजणीनंतर मात्र दोन गटात राडा झाला.

येळगाव ग्राम पंचायतीत ९ मतांनी विजयी झालेले दादाराव लवकर यांच्या पॅनलमधील उमेदवार सचिन गडाख यांचे भाऊ पंजाबराव गडाख यांना पराभूत उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना मतमोजणी कक्षाच्या बाहेर घडली. शहर पोलिसांनी वेळेवर घटनास्थळी धाव घेत जमाव पांगवला अन्यथा याच ठिकाणी दोन्ही गटात तुफान राडा झाला असता व मोठी घटना घडली असती.

येथील तहसील कार्यालयाच्या आवारात मंगळवारी सकाळी मतमोजणी करण्यात आली. यावेळी येळगाव येथील दादाराव लवकर यांना ९ मतांनी सरपंच म्हणून विजयी घोषित करण्यात आले होते. मात्र विरोधी गटाने पुनर्मोजणीचा अर्ज केल्याने पुन्हा मतमोजणी करण्यात आली. परंतु पुनर्मोजणीनंतरही निकालात कुठलाही फरक पडला नाही. त्यामुळे पराभूत उमेदवारांच्या समर्थकांचा राग अनावर झाला. विजयी सरपंच दादा लवकर यांचे समर्थक पंजाबराव गडाख यांना पराभूत उमेदवार अशोक गडाख यांच्या भाच्याने आयडीबीआय बँकेच्या चौकात गाडी थांबवून मारहाण केल्याची माहिती आहे.

या मारहाणीनंतर दोन्ही गटामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले हाेते. मारहाण होत असल्याची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून जमाव पांगवला. दरम्यान, या घटनेची तक्रार देण्यासाठी नवनिर्वाचित सरपंच दादाराव लवकर हे आपल्या शेकडो समर्थकांसह शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. उशीरापर्यंत गुन्हा दाखल नव्हता.

बातम्या आणखी आहेत...