आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरभरा:18 जून पर्यंत नाफेड कडून हरभरा खरेदीला मंजुर; ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पडली बंद

शेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शासनाकडून १८ जून पर्यंत नाफेड कडून हरभरा खरेदीला मंजुरात देण्यात आली होती. त्यामुळे सहाशे हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना येथील श्रीराम इस्टेटमधील नाफेड केंद्रावर हरभरा विक्रीसाठी आणण्याचे मेसेज पाठवण्यात आले होते. त्यानुसार तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी हजारो क्विंटल हरभरा विक्रीसाठी शहरातील श्रीराम इस्टेट मध्ये असलेल्या नाफेड केंद्रावर विक्रीसाठी आणला होता. परंतु त्यापैकी नाममात्र दोनशे शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करण्यात आला.

त्यानंतर नोंदणी प्रक्रिया बंद केल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे शेतकरी चांगलेच संतप्त झाले होते. हरभऱ्याची खरेदी न केल्यास वाहने तहसील कार्यालयात जमा करण्यात येतील, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. त्यावर सोमवारी हरभरा खरेदी करणार असल्याचे आश्वासनानंतर शेतकरी शांत झाले.हरभरा खरेदीला १८ जूनपर्यंत वाढीव मंजुरात देण्यात आली आहे.

त्यामुळे श्रीराम इस्टेटमधील नाफेड केंद्रावर हरभरा विक्रीसाठी आणण्याचे मेसेज शेतकऱ्यांना पाठवण्यात आले होते. मागील २ जूनपासून सहाशे शेतकरी हरभऱ्याची खाजगी वाहने भाड्याने करून आले होते. परंतु त्यापैकी केवळ दोनशे शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करण्यात आला. त्यानंतर अधिकारी व व्यापाऱ्यांचा हरभरा नाफेड केंद्रावर माेजून घेण्यात आला. उर्वरित शेतकऱ्यांना खरेदी नोंदणी वेबसाईट वरूनच बंद करण्यात आल्याचे सांगून त्यांचा हरभरा खरेदी करण्यास नकार देण्यात आला.

त्यामुळे शेकडो शेतकरी संतप्त झाले. कारण आज शुक्रवार उद्या आठवड्याचा शेवटचा दिवस त्यानंतर रविवार सुट्टी असल्याने शेतकऱ्यांना तीन दिवस येथेच लटकून राहावे लागत होते. परिणामी शेतकऱ्यांना तीन दिवसाचे खाजगी वाहनाचे भाडे सुद्धा भरावे लागणार होते. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आपापली वाहने तहसील कार्यालयात नेऊन उभे करण्याचा इशारा दिला. तहसील कार्यालयात एकही जबाबदार अधिकारी हजर नसल्याने शेतकरी हतबल झाले होते.

बातम्या आणखी आहेत...