आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन‎:योगांजलीच्यावतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई‎ फुले यांना अभिवादन‎

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाणा येथील योगांजली योग वर्गात पहाटेच आद्य‎ महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना अभिवादन‎ करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला योगशिक्षिका‎ अंजली परांजपे व योग वर्गाच्या समन्वयक गीता नागपूरे‎ यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप‎ प्रज्वलन केले .याप्रसंगी अंजली परांजपे म्हणाल्या की‎ ,आजच्या काळात ज्या मुली शिक्षण घेत आहेत‎ त्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी केलेले त्या काळातील‎ कार्यच आहे.

सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात पहिली‎ मुलींसाठी शाळा चालवली त्यांनी मुलींना शिकवले‎ नसते तर आज आपल्या देशात स्त्रियांनी एवढी उत्तुंग‎ भरारी घेणे कदापिही शक्य झाले नसते. या प्रसंगी‎ वैशाली कुलकर्णी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन‎ कार्यावर भाषण केले. या कार्यक्रमासाठी योग वर्गातील‎ स्मिता अग्रवाल, प्रियंका पाठक, अरुणा‎ महाजन,विजया शास्त्री,रोशनी बारी, चंद्रभागा महाले,‎ प्रीती अग्रवाल, ज्योती भडेज यांची उपस्थित होती.‎

बातम्या आणखी आहेत...