आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन‎:आदर्श ज्ञानपीठ इंग्लिश स्कुलमध्ये‎ सावित्रीबाई फुले यांना अभिवादन‎

खामगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील घाटापुरी नाक्याजवळील आदर्श‎ ज्ञानपीठ इंग्लिश स्कूलमध्ये ३ जानेवारी रोजी क्रांतिज्योती‎ सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात‎ आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष के.‎ आर. राजपूत हाेते. संस्थेचे सदस्य कविश्वर राजपूत यांची‎ विशेष उपस्थिती होती. यावेळी बोलताना के. आर.‎ राजपूत म्हणाले, की सावित्रीबाईंचा आदर्श डोळ्यांसमोर‎ ठेवून विद्यादानाचे कार्य सुरू असून, उद्याच्या भविष्याचे‎ थोर व्यक्तिमत्व या विद्यार्थ्यांमधून उदयास येईल, असे‎ मत व्यक्त केले. अनेक विद्यार्थीनींनी सावित्रीबाई फुले‎ यांची वेशभूषा साकारुन सर्वांचे लक्ष वेधले.

कार्यक्रमात‎ अनेक विद्यार्थीनींनी सावित्रीबाई फुले यांच्या‎ जीवनकार्यावर प्रकाश टाकला. प्रास्ताविक‎ मुख्याध्यापिका अनिता पळसकर यांनी केले. सूत्रसंचालन‎ भातुरकर यांनी केले, तर आभार चोपडे यांनी मानले.‎ कार्यक्रमासाठी ज्येष्ठ शिक्षिका महाजन, पर्यवेक्षिका‎ राजपुत, ज्योती वैराळे, माधुरी उगले, अश्विनी‎ देशमुख, कल्पना कस्तुरे, अलका वेरुळकर, विजया‎ पोकळे, प्रिया देशमुख, गायत्री पोकळे, सारीका‎ सरदेशमुख, कोमल आकनकर, सपना हजारे, वंदना‎ गावंडे, सुवर्णा वडोदे, स्वाती बोके, राजकन्या वडोदे‎ आदींनी परिश्रम घेतले.‎

बातम्या आणखी आहेत...