आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या चार महिन्यापासून वेतन न मिळाल्याने भूजल सर्वेक्षणाचे कर्मचारी संपावर गेले होते. त्यामुळे पाणी गुणवत्तेचा दर्जा तपासणीसाठी आलेले १६९६ अहवालाचे अद्याप काय झाले? या बाबत अस्पष्टता आहे. हे नमुने संबधित विभागाला स्वच्छता व पाणी गुणवत्ता तपासणी विभागाने पाठवले होते. परिणामी एखाद्या गावात दूषित पाणी पुरवठा होत असेल तर जलजन्य आजाराला तोंड द्यावे लागणार आहे. तर या भूजल सर्वेक्षणाच्या १७ कर्मचाऱ्यांना अजुनही शासनाने वेतन दिले नाही.
शासनाच्या वतीने उन्हाळ्यात रासायनिक तर पावसाळ्यात जैविक तपासणी करण्यात येते. स्वच्छता व पाणी गुणवत्ता विभागाच्या वतीने या पाण्याचे नमुने घेतल्या जातात. वर्षभरात रासायनिक तपासणीचे ५३३६ नमुने व जैविक तपासणीचे ४९१९ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. जिल्ह्यातील ८६९ ग्राम पंचायतीमधील ७११ महिलांनी हे नमुने घेतले होते. यामधील १ हजार ६९६ नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी एकही नमुन्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला नाही. मार्च महिन्यापासून भूजल यंत्रणेचे कर्मचारी संपावर गेल्यामुळे हे अहवाल तसेच रखडले आहे. त्वरीत अहवाल प्राप्त झाल्यास त्यावर त्वरीत कारवाई करण्यात येते.
भूजल सर्वेक्षणाचे कर्मचारी नुकतेच कामावर परतले आहे. त्यांना वेतन देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांनी काम सुरु केले असून नमुन्याचा अहवालही आता उपलब्ध होऊ लागणार आहे. परंतु, या कर्मचाऱ्यांना अजुनही वेतन मिळाले नाही. गेले पाच महिने झाले वेतन मिळत नसल्याने या कर्मचाऱ्यांची कामाची मानसिकता किती टिकून राहील. या महिन्यात वेतन झाल्यास कर्मचारी पुन्हा संपाचा बडगा उगारणार नाही व अहवाल लवकर मिळणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.