आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांना मार्गदर्शन:मासरुळ येथे कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना अळी बाबत मार्गदर्शन

मासरूळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोयाबीन वरील चक्री भुंगा, खोड माशी, शेंगा पोखरणारी अळी, उंट अळी, कपाशी वरील गुलाबी बोंड अळी, मावा, तुडतुडे, पांढरी माशी, मका पिकावरील फॉल आर्मी वर्म, अमेरिकन लष्करी अळी, नवीन येणारी उडीद व मूग पिकावरील महारुका अळीचा प्रादुर्भाव, हुमनी अळीचे नियंत्रण तसेच कीटक नाशके फवारणी करताना घ्यावयाची काळजी याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

कपाशी वरील गुलाबी बोंड अळी नियंत्रणाचे प्रात्यक्षिक शेतकरी हरिभाऊ सिनकर यांच्या शेतात दाखवण्यात आले. तसेच उत्पादन वाढ पंधरवडा कार्यक्रमातंर्गत मासरूळ येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्राला जिल्हा कृषी अधीक्षक डाबरे, कृषी शास्त्रज्ञ जायभाये,कीटक शास्त्रज्ञ देशपांडे, तालुका कृषी अधिकारी डी. एम. मेरत, दिपक लोखंडे, धनंजय सोनुने, कृषी पर्यवेक्षक अनिल सोनुने व अरुण शेळके तसेच गजानन इंगळे यांच्यासह गावातील शेतकरी शेषराव सावळे, दिलीप शिणकर, मधुकर महाले, नंदकिशोर देशमुख, संभाजीराव देशमुख, किरण उगले, हरिभाऊ सिनकर, सुनील सावळे, रमेश भगत, गजानन साळवे, डॉ. फुसे, देवेंद्र पायघन उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...